Naseeruddin shah birthday: अनेक गोष्टींवर ज्येष्ठ अभिनेते नसिरूद्दीन शहा यांच्या वादग्रस्त वक्यव्यांशी कायमच चर्चा झाली आहे. त्यामुळे नसिरूद्दीन शहा अनेक अनेकदा चर्चेत आले होते. आज नसिरूद्दीन शहा यांचा वाढदिवस आहे. आपले आवडते अभिनेते आज 73 वर्षांचे झाले आहेत. एकेकाळी हिंदी सिनेमा हा तद्दन मसालापट, अॅक्शनपट असताना त्या काळात नसिरूद्दीन शहा यांनी आपल्या आगळ्या आणि अस्सल अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्वंही रूबाबदार आहे. त्या काळी जेव्हा हॅण्डसम हंक अशी हिरोची कल्पना असल्या कारणानं नसिरूद्दीन शहा यांना अनेकदा त्यावरून टोमणे एकावे लागले होते. त्यामुळे त्यांचा चित्रपटसृष्टीत येण्याचा मार्ग काही सहज मोकळा नव्हता. अनेक अडथळे पार करून ते हिंदी चित्रपटसृष्टीत आले आहेत आणि त्यांनी आपली वेगळी ओळखही बनवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्ना पाठक शहा आणि नसिरूद्दीन शहा हे कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. सोबतच त्यांनी मुलंही या क्षेत्रात सक्रिय आहेत. परंतु मध्यंतरी त्यांची चर्चा रंगली ती म्हणजे त्यांच्या वादग्रस्त वक्यव्यांची. आज आपण त्यांच्या अशाच काही वादग्रस्त वक्तव्यांवर बोलणार आहोत. परंतु आज त्याचा वाढदिवस असल्याकारणानं त्यांच्याविषयीही आपल्याला माहित नसलेल्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. नसिरूद्दीन शहा यांनी हरएक माध्यमांतून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. नाटक, जाहिरात, चित्रपट, मालिका आणि आताच्या वेबसिरिजपर्यंतही ते सक्रिय आहेत. या वयातही ते अगदी उत्साही आणि ताजेतवाने असतात. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा रंगताना दिसते.


नसिरूद्दीन शहा यांचा जन्म हा 20 जूलै 1950 रोजी बाराबंकी, उत्तर प्रदेश येथे झाला होता. त्यांना पद्मश्री आणि पद्मभुषण या दोन मोठ्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी हिंदीच नाही तर हॉलिवूडच्या चित्रपटांतूनही कामं केली आहे. त्यांनी दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. 


हेही वाचा - 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम स्वानंदी टिकेकरनं दिली 'त्याच्या'वरील प्रेमाची कबुली


काय होती वादग्रस्त वक्तव्य? 


  • नसिरूद्दीन शहा यांनी मुगलांच्या इतिहास गौरवशाली असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरून अनेकांनी टीका केली होती. ट्विटरवरूनही त्यांच्यावर टीका झाली होती.

  • त्यांनी लव्ह जिहाद हा दोन धर्मांमध्ये फूट पाडण्यासाठी आहे असे म्हटले होते.  त्यातून CAA वरही त्यांनी विरोध दर्शवला होता. 

  • आपल्याला भारतात राहायची भीती वाटते असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले होते ज्यावरून बराच गदारोळ झाला होता सोबतच असेच एक वक्तव्य हे आमिर खान यानंही केले होते.