मुंबई : उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये 20 जुलै 1950 रोजी जन्मलेले अभिनेते नसीरुद्दीन शाह 71 वर्षांचे आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. नसीरुद्दीन शाह त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या कामगिरीमुळे प्रसिद्ध आहेत. नसीरुद्दीन शाह यांना 'पद्मभूषण' आणि 'पद्मश्री' पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला त्यांची पहिली पत्नी, त्यांचा घटस्फोट आणि रत्ना पाठक यांच्याशी केलेल्या लग्नाविषयी किस्सा सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नसीरुद्दीन 20 वर्षांचे होते. तेव्हा त्यांनी त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या मनारा सिक्रीशी लग्न केलं. मनारा यांना परवीन मुराड म्हणूनही ओळखलं जात. परवीन सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा सिक्री यांच्या बहीण आहेत. नसीरुद्दीन यांचं कुटुंब त्यावेळी त्यांच्या लग्नामुळे खुश नव्हतं. लग्नानंतर वर्षभरातच मनारा आणि नसीर यांच्यात मतभेद झाले आणि हे दोघंही वेगळे राहू लागले.


या दोघांनाही 'हिबा शाह' नावाची एक मुलगी आहे, जी बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. त्यानंतर नसीरुद्दीन रत्ना पाठक यांना भेटले. मनारापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचं लग्न रत्ना पाठक यांच्याशी झालं. रत्ना यांच्याशी लग्न केल्यानंतर नसीरुद्दीन यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर, त्यांची मुलगी हीबा त्यांच्यासोबत राहू लागली.


नासिर आणि रत्ना यांना इमाद आणि विवान अशी दोन मुलं आहेत. दोघांचं धर्म वेगळा असूनही, ते बर्‍याच वर्षांपासून एकत्र आहेत. लग्नाआधी दोघंही बरीच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनी 'मिर्च मसाला' आणि 'द परफेक्ट मर्डर'सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं.


नसीरुद्दीन शाह यांच्या चित्रपटांबद्दल बोलताना त्यांनी 'आक्रोश', 'स्पर्श', ' मिर्च मसाला', 'भवानी भवई', 'अर्ध सत्य', 'मंडी' आणि 'चक्र'  यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नसीरुद्दीन यांनीही अभिनयासोबतच दिग्दर्शन म्हणूनही कामं केलं आहे. 'स्पार्श' आणि 'पार' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.