Naseeruddin Shah Played the Role Of Chhatrapati Shivaji Maharaj: संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती (Shiv Jayanti) सोहळा साजरा करणार आहेत. तसेच महाराष्ट्र सरकारकडून तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते. त्यांच्यावर आजपर्यंत अनेक चित्रपट आले. अनेक अभिनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अशी आहे जी कोणीही साकारली तरी लोक त्यांच्याकडे आदरानं पाहतात. मात्र, तुम्हाला माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका एकदा अभिनेते नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनाही साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1989 साली दूरदर्शनवर 'भारत एक खोज' (Bharat Ek Khoj) ही मालिका प्रदर्शित झाली होती भारतीय संस्कृतीचा सामाजिक, भौगोलिक आढावा या मालिकेतून पाहायला मिळाला. श्याम बेनेगल यांनी या मालिकेचे दिग्दर्शिन केले होते. याच मालिकेच्या 37 आणि 38 व्या एपिसोडमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवानाचा आढावा घेण्यात आला होता. या एपिसोडमध्ये शिवाजी महाराज, जिजाबाई, दादोजी कोंडदेव अशी पात्र दाखवण्यात आली होती. यावेळी महाराजांच्या भूमिकेत नसिरुद्दीन शाह दिसले होते. 



नसिरुद्दीन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अप्रतिमपणे साकारली होती. महाराजांचा रुबाब, त्यांची बोलण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, त्यांची तीक्ष्ण नजर हा नसिरुद्दीन यांनी साकारलेल्या भूमिकेतून प्रेक्षकांना पाहता येत होता. मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबात झालेला संघर्ष दाखवण्यात आला होता. त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कसा वध केला ते दाखवण्यात आले. नसिरुद्दीन यांनी साकारलेल्या या भूमिकेनं प्रेक्षकांना आश्चर्यात पाडलं होतं. 


दरम्यान, आता अनेकांना प्रश्न पडला असेल की मालिकेच नाव हे भारत एक खोज आहे मग त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कसा पाहता आला. या मालिकेत फक्त महाराज नाही तर आचार्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, महात्मा गांधींपर्यंत अनेकांनी काय काय केलं हे दाखवण्यात आलं आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तथापि, त्याच्या जन्माबद्दल इतिहासकारांमध्ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्यांचा जन्म 1630 मध्ये झाला होता, तर काहींच्या मते त्यांचा जन्म 1627 मध्ये झाला होता. शिवाजीचे वडील शहाजी भोसले हे अहमदनगर सल्तनतमध्ये सैन्यात सेनापती होते. त्यांची आई जिजाबाई या स्वतः एक योद्धा होत्या पण त्यांना धार्मिक ग्रंथांमध्येही खूप रस होता. त्यांच्या या धार्मिक आवडीमुळे त्यांनी लहान वयातच महाभारत ते रामायण ते शिवाजी असे धार्मिक ग्रंथ शिकवले होते.भारत एक खोज हि ५३ भागांची मालिका होती. या मालिकेत चाणक्य, चंद्रगुप्त पासून शिवाजी महाराज, विवेकानंद, महात्मा गांधींपर्यंत अनेकांच्या कार्याचा आढावा घेतलाय. मालिकेत शिवाजी महाराज यांची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी साकारली.