नवी दिल्ली : चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. तसेच आंतरमंत्रालय समितीला सहा महिन्यात नवे नियम जारी करण्याचे आदेश दिलेत.


 सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी आता राष्ट्रगीत लावणं सक्तीचं असणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं ३० नोव्हेंबर २०१६ मध्ये दिलेल्या आपल्या निकालपत्रात बदल करत हा निर्णय दिलाय. 


अंतीम निर्णय १२ सदस्यीय समिती घेणार


मात्र यासंदर्भातला अंतिम निर्णय केंद्र सरकारनं स्थापन केलेली १२ सदस्यीय समिती घेणार असल्याचं आपल्या निकालपत्रात नमूद केलंय. ही समिती पुढच्या सहा महिन्यांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती अटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांनी न्यायालयाला दिली. 


या आधी यांना होती सूट


यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यावर सक्ती केली होती. यातून केवळ शारिरीक अपंग असलेल्या व्यक्तींना सूट देण्यात आली होती. यावर हरकत घेत केंद्र सरकारनं सक्ती न करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती.