मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशातील नागरिकांना कोरोना Coronavirus विषाणूच्या या तणावपूर्ण परिस्थितीत संबोधित केलं तेव्हा ते एका वेगळ्या रुपात दिसले. यावेळी त्यांनी एक गमछा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. अर्थाच पंतप्रधानांच्या या लूकचीही सोशल मीडियावरही चर्चा झाली. ज्यावर आता सेलिब्रिटी फॅशन डिझायनर नीता लूल्लानेही प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका व्हिडिओदरम्यान, तिने या गमछ्याविषयीचं मत मांडलं. हा गमछा वापरुन पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच साऱ्या विश्वासमोर आणली आहे, असं ती म्हणाली. 'देशाला संबोधित करतेवेळी पंतप्रधानांनी तोंडावर हा गमछा लावून त्याला एक वेगळं महत्त्वं दिलं'. 


मुळात घरात मास्क उपलब्ध नसल्यास घरातील उबलब्ध गोष्टी किंवा कापडाचाच नाक आणि तोंड झाकणअयासाठीचा मास्क म्हणून वापर कसा करावा ही बाब इथे अधोरेखित करायची होती. आपल्याला कोणत्याही प्रकारची हाणी पोहोचणार नाही, विषाणूचा संसर्ग टाळला जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जाईल ही बाब इथे महत्त्वाची होती. 


 


'झी न्यूज'च्या वृत्तानुसार, आपलं मत मांडत पुढे नीता म्हणाली, गमछा हा भारतीय  संस्कृती, वेशभूषेचा एक मोठा भाग आहे. अनेकजणांची याला पसंती आहे. तिच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र गमछा परिधान करण्याची प्रथा आहे. नैसर्गिक सूतापासून तयार करण्यात आल्यामुळे तो घाम शोषून घेतो. उष्ण दिवसांमध्ये हा अधिक फायद्याचा ठरतो. त्यामुळे मोदींच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं की, भारतीय संस्कृती आणि पोशाखातून खूप गोष्टी या अनुकरणीय असून, सध्याच्या घडीला कोरोनाशी लढण्यासाठीसुद्धा त्या फायद्याच्या ठरतील.