अवघ्या 2 रुपयांना मिळणारं पिक्चरचं तिकीट आज परवडण्यापलीकडे, असं का?
जाणून घ्या, कशा प्रकारे तिकिटांच्या किंमतीत कसा बदल झाला...
मुंबई : आजच्या डिजिटल युगात लोक कुठेतरी चित्रपटगृहाला विसरत आहेत. पण, मोबाईल OTT चा या नव्या युगातही काही लोकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला आवडतं. पूर्वीच्या काळी चित्रपटगृहांबाहेर उभ्या असलेल्या चित्रपटाच्या चाहत्यांची तिकिटंही काळ्या रंगात विकली जायची. 23 सप्टेंबर रोजी देशभरात सिनेमा दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्तानं चित्रपटाविषयी एक खास माहिती म्हणजेच की चित्रपटगृहातील तिकिटांची किंमत किती होती जाणून घेऊया...
आणखी वाचा : राखीशी लग्न करण्यावर बॉयफ्रेंड आदिलचा नकार? जाणून घ्या प्रकरण
त्या काळाबद्दल बोलायचं झालं तर तेव्हा लोकांना चित्रपटाची एक वेगळीच क्रेझ होती. जेव्हा मधुबाला आणि दिलीप कुमार यांचा मुघल-ए-आझम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपट पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी जमायची होती आणि तिकीटाची किंमत फक्त 2 रुपये होती. या चित्रपटात अकबराच्या भूमिकेत पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या अभिनयाची अशी जादू लोकांच्या मनावर केली की आजही लोक त्यांच्या आठवणीत आहेत. 1960 साली मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात लोकांनी इतक्या स्वस्त तिकीटात चित्रपटाचा आनंद लुटला होता.
आणखी वाचा : 'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे
‘पाकीजा’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला. या चित्रपटात मीना कुमारी मुख्य अभिनेत्री होत्या, तर त्यांच्यासोबत राजकुमार मुख्य भूमिकेत होते. 1972 साली प्रदर्शित झालेला हाचित्रपट पाहण्यासाठीही थिएटरबाहेरची लोकांची क्रेझ पाहण्यासारखी होती. या चित्रपटाच्या तिकिटाबद्दल बोलायचं झालं तर लोकांनी त्याचं तिकीट केवळ 3 रुपयांना घेतलं होतं. मुंबईतील मराठा मंदिरातही हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. (National Cinema Day 2022 Know The Movie Tickets Prices Offers In India Read The Details)
आणखी वाचा : 'गौरी तुला कधी...', पत्नी विषयी विचारलेल्या 'त्या' खासगी प्रश्नावर Shahrukh Khan म्हणाला...
जसजसा काळ पुढे गेला तशी महागाई गगनाला भिडली. यानंतर तिकिट हे 4.95 रुपये, नंतर 6 रुपये, नंतर 7 रुपये आणि आज 500 रुपये झालं. त्याचवेळी, राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या (National Cinema Day) दिवशी पुन्हा एकदा चित्रपट केवळ 75 रुपयांमध्ये देशभरातील प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील 4 हजारांहून अधिक स्क्रीनवर लोकांना 75 रुपयांमध्ये चित्रपट दाखवले जातील.
आणखी वाचा : आमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...'
75 रुपयांत तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहाच्या बाहेरूनच तिकीट खरेदी करावं लागेल. याशिवाय तुम्ही हे तिकीट ऑनलाइन माध्यमातूनही खरेदी करू शकता. ज्यासाठी तुम्हाला GST आणि इंटरनेट फीचे शुल्कही वेगळं भरावं लागेल.