राखीशी लग्न करण्यावर बॉयफ्रेंड आदिलचा नकार? जाणून घ्या प्रकरण

आदिलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Sep 23, 2022, 01:23 PM IST
राखीशी लग्न करण्यावर बॉयफ्रेंड आदिलचा नकार? जाणून घ्या प्रकरण title=

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आणि बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी (Adil Durrani) गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. हे दोघं सतत एकत्र दिसतात. राखी आणि आदिल लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा देखील काही दिवसांपूर्वी सुरु होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्नाच्या बातमीला स्पष्टपणे नकार दिला असून यामागचं कारण राखीला त्यानं सांगितलं आहे. आदिलच्या म्हणण्यानुसार राखीचा त्याच्यावर 100 टक्के विश्वास नाही, तर तो तिच्याशी लग्न कसं करेल.  (Rakhi Sawant And Adil Durrani Wedding Plan)

आणखी वाचा : 'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे

राखीमुळे सतत चर्चेत असणारा आदिल देखील आज लोकप्रिय ठरला आहे. नुकतेच दोघेही एका म्युझिक व्हिडीओमध्ये दिसले. यावेळी एका मुलाखतीत आदिलला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी आदिलनं धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्याविषयी राखी असुरक्षित आहे, ती फक्त त्याच्यावर संशय घेत नाही तर जेव्हा तो होम टाऊन जातो तेव्हा तो काय करत आहे हे शोधण्यासाठी त्याच्या मागे एका माणसाला पाठवते. राखीला शंका आहे की, आदिलचं त्याच्या एक्स गर्लफ्रेंडशी कोणते संबंध आहेत. याच कारणामुळे आदिलनं राखीच्या लग्नाच्या प्लानिंगला तूर्तास पुढे ढकलले आहे. राखीनं संशय घेणं थांबवलं तरच तो लग्न करणार आहे. (Adil Durrani cancel s marriage plan with rakhi sawant sayiong she do not trust him) 

आणखी वाचा : 'गौरी तुला कधी...', पत्नी विषयी विचारलेल्या 'त्या' खासगी प्रश्नावर Shahrukh Khan म्हणाला...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : आमिर खानच्या घरी लगीनघाई, फातिमा सना शेख म्हणाली, 'ही सगळ्यात गोड गोष्ट...'

दरम्यान, आदिलनं लग्नास नकार दिला असला तरी नुकतीच राखीनं 'बिग बॉस'च्या घरात आदिलसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिनं सांगितलं की तिला बिग बॉसचा भाग व्हायचे आहे आणि तिथे आदिलशी लग्न देखील करायचं आहे. सलमान खाननं (Salman Khan)कन्यादान करावे अशी तिची इच्छा आहे.