मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या मदतीला राष्ट्रीय महिला आयोग आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अटकेची मागणी केलीय. आमदार सरनाईक यांनी कंगनाला इशारा दिला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रताप सरनाईक यांनी कंगना प्रकरणी ट्वीट केलं होतं. संजय राऊतांनी कंगनाला नम्र भाषेत समज दिली आहे.  इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत असे सरनाईक म्हणाले होते.  कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. कारण कंगनाने 
उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याचे ते म्हणाले.



दरम्यान भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे असे सरनाईक यांनी ट्वीट करत म्हटलंय. 


मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही असेही सरनाईक पुढे म्हणाले.