विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
दिल्लीत केंद्र सरकारच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : दिल्लीत केंद्र सरकारच्या ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात सु्प्रसिद्ध दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. विनोद खन्ना यांचं २७ एप्रिल २०१७ रोजी निधन झालं होतं.मेरे अपने, मेरा गांव मेरा देश, कच्चे धागे, मुकद्दर का सिकंदर, अमर-अकबर एंथनी, द बर्निंग ट्रेन, खून-पसीना, चांदनी हे त्याचे निवडक चित्रपट आहेत, ज्यात त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं.
खलनायकमधील त्यांच्या भूमिकेचंही मोठं कौतुक झालं. चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्यासोबतची त्यांची जुगलबंदी विशेष गाजली. याशिवाय मॉम चित्रपटासाठी अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विनोद खन्ना हे भाजपाचे खासदार देखील होते. गुरूदासपूरमधून निवडून येत होते.
या व्यतिरिक्त:
सर्वोत्कृष्ट अभिनेता : रिधि सेन (फिल्म सिटी टुरिझमसाठी)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : न्यूटन
सर्वोत्कृष्ट कोरियोग्राफी: "शौचालय एक प्रेम कथा" या गाण्यात गणेश आचार्य, 'गोरी तू लठ्ठ मार' या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या 'मम' चित्रपटासाठी ए. आर. रहमान
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर : बाहुबली 2
राष्ट्रीय पुरस्कार, चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट समीक्षक: गिरीधर झा
सर्वोत्कृष्ट गायक मेल : येशूदास
फीचर फिल्म बेस्ट आसामी फिल्म : इशू
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: मयूरक्षी
सर्वोत्कृष्ट जसारी चित्रपट : सिंजारा
बेस्ट लाडी फिल्म: वॉकिंग विद द विंड
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: कच्चा लिंबू
सर्वोत्कृष्ट मूव्ही: हॅलो
अर्सी बेस्ट टुलू चित्रपट: पद्दाई