मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्माचे प्रेक्षक आणि शोचे कलाकारही नट्टू काकांची व्यक्तिरेखा खूप मिस करत होते. त्यामुळे आता निर्मात्यांनी नवीन नट्टू काकांचा शोध पूर्ण केला आहे. ही व्यक्तिरेखा आतापासून शोमध्ये दिसणार आहे. शोचे निर्माते असित मोदी यांनी प्रेक्षकांना नवीन नट्टू काकांची ओळख करून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर
तारक मेहता का उल्टा चष्मा या शोच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून नवीन नट्टू काकांची झलक दाखवण्यात आली आहे. या फोटोमध्ये असित मोदीसोबत उभा असलेला व्यक्ती आता शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार आहे.


घनश्यान नायक यांचं गेल्या वर्षी निधन झालं
घनश्याम नायक गेल्या 13 वर्षांपासून ही व्यक्तिरेखा साकारत होते. मात्र गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृतीही सुधारली. पणनंतर सप्टेंबरच्या अखेरीस त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.


घनश्याम नायक यांनी ३ ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला.  घनश्याम नायक हे केवळ प्रेक्षकांचेच नव्हं तर कार्यक्रमातील इतर कलाकारांचेही आवडते होते. शोशी संबंधित अनेक चेहरे त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.