मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी स्टारर 'मोतीचूर' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. लग्न जमत नसल्यामुळे नवाज सतत त्रासलेला असतो. अनेक मुली पाहिल्यानंतर त्याच्या आयुष्यात अखेर आथियाची एन्ट्री होते. नंतर त्यांच्या नात्याचा विनोदी प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'मोतीचूर' चित्रपटाच्या माध्यमातून नवाज-आथिया पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. अनेक अडचणींनंतर खुद्द नवाजने स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री सनी लियोनी आयटम सॉन्गवर थिरकताना दिसताना असणार आहे.


नवाज आणि आथिया शिवाय चित्रपटात विभा चिब्बर, नवनी परिहार, विवेक मिश्रा, करूणा पांडे, संजीव वत्स, अभिषेक रावत, सपना सँड आणि उषा नागर सुद्धा झळकणार आहे.