Navneet Nishan and Aamir Khan Kiss : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. त्यानं आजवर जे चित्रपट केले त्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहतो. आमिरच्या याच परफेक्शनिस्ट अंदाजामुळे त्याचे फक्त भारतात नाही तर परदेशातही चाहते आहेत. दरम्यान, आमिरच्या 'हम हैं राही प्यार के' या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 30 वर्षे झाली आहेत. या निमित्तानं चित्रपटाविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. तर चित्रपटात अभिनेत्री नवनीत निशान ही आमिरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाल्यानं नवनीतनं काही मजेशीर गोष्टींचा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनीत निशाननं हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नवनीतनं 'हम हैं राही प्यार के' चित्रपटाविषयी सांगितलं. नवनीत यांनी खलनायकाच्या मुलीची भूमिका साकारली होती. नवनीत यांच्या भूमिकेचे नाव माया असे होते. माया ही राहुलची म्हणजेच आमिर खानच्या भूमिकेची गर्लफ्रेंड होती. त्या दोघांमध्ये एक किसिंग सीन होता. हा सीन खरंतर चित्रपटातून काढून टाकण्यात आला होता. त्याविषयी नवनीत यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नवनीत म्हणाल्या, आमिर तर आमिर आहे. त्यांनी माझ्याकडून पूर्ण दिवसभर किसिंग सीन करून घेतला होता. ते म्हणाले की किसमध्ये कंटीन्यूटू असायला हवी त्यामुळे पूर्ण दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली. त्यावेळी संपूर्ण दिवसात त्यानं 7-8 वेळा गालावर किस केलं. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नवनीत यांनी सांगितले की आमिर खानपासून जूही चावला पर्यंत इतर कलाकारांसोबत काम करण्यासाठी खूप उत्साही होते. हा तिच्यासाठी खूप मोठी संधी होती. त्यांनी हे देखील सांगितलं की जेव्हा त्या आमिर खानच्या घरून परत आली तेव्हा त्यांनी सगळ्यांना सांगितलं की 'मी दिवसभर आमिर खानला किस केलं! माझी तर लॉटरी लागली'. 


हेही वाचा : दर पाचव्या मिनिटाला गमावले 10 हजार रुपये; ऑनलाईन फ्रॉडनं अभिनेत्रीवर संकटांचा डोंगर


पुढे नवनीत यांनी चित्रपटातील आणखी एका सीनविषयी सांगितले. या सीनमध्ये नवनीत यांच्यावर लहाणमुलं अंडी फोडण्याचा सीन होता. त्यावेळी त्यांना जावलं होतं की अंडी जोरात लागतात. त्यावर आमिरनं युक्ती लावली आणि अंडी आधीच फोडूण घेतली होती. 


'हम हैं राही प्यार के' हा चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'घूंघट की आड़ से', 'यूं ही कट जाएगा सफर', 'बंबई से गई पूना' ते 'मेरी नींद मेरा चैन' सगळीच गाणी हिट झाली.