Hemal Ingale Engagement : मराठी चित्रपटसृष्टीत लग्न सराईचे वारे वाहत आहेत असं म्हणायला हरकत नाही. अनेक कलाकार हे सप्तपदी घेताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांनंतर आता अभिनेत्री हेमल इंगळेनं साखरपुडा केला आहे. हेमलनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेमल इंगळेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोत हेमल ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. तिच्या बॉयफ्रेंडचं नाव रोनक असं आहे. साखरपुड्यासाठी हेमलनं जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं अर्थात रोनकनं त्याच्या लाइट शेडचा कुर्ता परिधान केला आहे. ते दोघं एकत्र सुंदर दिसत आहेत. हेमल इंगळेनं शेअर केलेल्या या फोटोंना नेटकरी लाइकचा वर्षाव करत आहेत. इतकंच नाही तर अनेकांनी 



रोनकसोबत फोटो शेअर करत हेमलनं कॅप्शन दिलं की 'Ex-Boyfriend तळटीप - तुमच्या सगळ्यांना असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, Ex-Boyfriend कारण आता मी त्याला (फियान्से) माझा होणारा नवरा असं बोलते.' हेमलनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.  श्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी, सौरभ चौघुले, रिंकू राजगुरु, फुलवा खामकर, रसिका सुनील कलाकारांनी हेमल आणि रोनकला शुभेच्छा दिल्या आहेत. तर स्वप्नील कमेंट करत म्हणाला, 'अखेर कुठेय तो? या प्रश्नाचं उत्तर मिळालं.'


हेही वाचा : 'ती' हत्या, राजकारण आणि कट: Sheikh Hasina यांचं आयुष्य दाखवणारे दोन चित्रपट!


हेमलच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ‘अशी ही आशिकी’ मुळे ती घराघरात पोहोचली. या चित्रपटात हेमलनं अभिनय बेर्डेबरोबर काम केलं. आता हेमल सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा 2’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्यात अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव दिसणार आहेत. तर हेमल आणि स्वप्नीन जोशी एक कपल म्हणून दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन पिळगांवकर करणार आहेत. येत्या 20 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.