'ती' हत्या, राजकारण आणि कट: Sheikh Hasina यांचं आयुष्य दाखवणारे दोन चित्रपट!

Movies on Bangladesh Former PM Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या अनेक घटना या अर्थात त्यांच्या कुटुंबा विरोधात रचण्यात आलेला कट आणि हत्या या सगळ्या गोष्टी या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतील. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 6, 2024, 12:47 PM IST
'ती' हत्या, राजकारण आणि कट: Sheikh Hasina यांचं आयुष्य दाखवणारे दोन चित्रपट! title=
(Photo Credit : Social Media)

Movies on Bangladesh Former PM Sheikh Hasina : सगळीकडे आता बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराची चर्चा सुरु आहे. जनतेत संताप आणि रोश पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांचे निदर्शन इतकं झालं की बांगलादेशचे पंतप्रधआन शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा लागला आणि इतकंच नाही तर देश देखील सोडावा लागला. शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या या घटनेनं सर्वांनाच आश्चर्य झालं. मात्र, त्यांच्या आयुष्यात असं काही पहिल्यांदा झालं असं नाही त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार हे आधी आले आहेत. याशिवाय त्यांच्या आयुष्यावर चित्रपट देखील बनवण्यात आले आहेत. 

हसीना: अ डॉटर्स टेल

पिपलू खान यांच्या दिग्दर्शनात बनवण्यात आलेल्या या डॉक्यू-ड्रामा शेख हसीना यांचं आयुष्य उत्तम पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात स्वत: शेख हसीना बोलताना दिसल्या. हा चित्रपट 16 नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. 70 मिनिटांच्या या माहितीपटाची सगळीकडे चर्चा रंगली होती. रिपोर्ट्सनुसार, बंगाली भाषेत असलेल्या या चित्रपटाचं 1.8 कोटींचं बजेट होतं. या चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यात आलं. 

काय आहे पटकथा?

या डॉक्यू-ड्रामा चित्रपटात 1975 मध्ये हसीनाचे वडील शेख मुजीबुर हरमान आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांच्या हत्येची घटना दाखवण्यात आली होती. या चित्रपटात शेख हसीना यांची बहीण शेख रेहाना देखील बोलताना दिसली. त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात रचण्यात आलेला कट पाहता त्यांच्या कुटुंबातील सदस्याची हत्या करण्यात आली होती. 

'मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन'

शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबावर आलेल्या या संकटांवर आणखी एक चित्रपट बनवण्यात आला होता. त्यांच्या या चित्रपटाचं नाव 'मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन'. या चित्रपटाचे दिग्दर्शन बंगाली चित्रपटातील लोकप्रिय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केली होते. चित्रपटात आरिफिन शुवू, नुसरत इमरोज तिशा, फजलुर रहमान बाबू, नुसरत फारिया, रियाज अहमद, दिलारा जमान महत्त्वाच्या भूमिकेत होते. 'मुजीब' हा चित्रपट 13 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. 178 मिनिटाच्या या चित्रपटाचं बजेट हे 83 कोटी होतं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 41 मिलियनची कमाई केली होती. 

हेही वाचा : किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले! नेहा धुपिया म्हणाली, 'मी विवाहित...'

या चित्रपटाची पटकथा ही शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्यापासून झाली. चित्रपटात दाखवण्यात आलं की कशा प्रकारे ते तुरुंगात सुटून बांगलादेशला येतात. त्यानंतर कशा प्रकारे एका नव्या देशाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात.