Navya Naveli Nanda : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची लेक नव्या नवेली नंदा ही तिच्या पॉडकास्टसाठी ओळखली जाते. 'व्हाट द हेल नव्या' या पॉडकास्टमधून बच्चन कुटुंबातील अनेक गोष्टी त्यांच्या चाहत्यांना सहज कळत असतात. त्याचा प्रत्येक एपिसोड हा नेहमीच लोकांचे लक्ष वेधताना दिसतो. सध्या नव्याच्या या पॉडकास्टचा दुसरा सीझन सुरु आहे. नव्याच्या पॉडकास्टवर नेहमी जया बच्चन आणि श्वेता बच्चन या दिसायच्या. आता त्यांच्या या पॉडकास्टमध्ये आर्चीज फेम अभिनेता अगस्त नंदा देखील दिसला आहे. तर हा एपिसोड पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. जेव्हा या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला तेव्हा अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये जाऊन ऐश्वर्या रायला पुढच्या एपिसोडमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'व्हाट द हेल नव्या' या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोतून कळालं की या एपिसोडमध्ये प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राइज आहे. आगामी एपिसोडमध्ये सगळ्यांना जया बच्चन, श्वेता बच्चन, नव्या नवेली नंदा व्यतिरिक्त अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. बच्चन कुटुंबातील चार लोकांमध्ये होणाऱ्या या मजेशीर गप्पा पाहण्यासाठी त्यांची चाहते आतुर आहेत. मात्र, कुटुंबात आणखी एक सदस्य आहे. ज्याला प्रेक्षकांना या शोमध्ये पाहायचं आहे. त्या सदस्यचं नाव आहे ऐश्वर्या राय बच्चन. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


शोच्या प्रोमोमध्ये अगस्त्य म्हणतो की 'माझं संगोपन हे सशक्त महिलांकडून करण्यात आलं आहे. मला असं वाटतं की मी दोन्ही लिंगांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकतो.' अगस्त्यचं हे म्हणण ऐकून त्याची आई श्वेता म्हणते, 'मला माहित नव्हतं की अगस्त्य, तू इतका हुशार झाला आहेस.'


हेही वाचा : रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?


या पॉडकास्टमध्ये अगस्त हा जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेलीसोबत बोलताना दिसणार आहे. त्याविषयी विविध गंभीर विषयांवर एक कुटुंब म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून काय वाटतं यावर सहजपण ते आपल्याला बोलताना दिसणार आहेत. नव्याच्या या पॉडकास्टमधील कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नेटकरी ऐश्वर्याला पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आता पुढे नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार आतुर आहेत.