रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये?

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani's Relationship with Dhiraj Deshmukh: रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नानंतर धीरज देशमुखनं का वाटली मिठाई?

दिक्षा पाटील | Updated: Feb 22, 2024, 12:37 PM IST
रकुलच्या लग्नानंतर धीरज देशमुख यांनी वाटली मिठाई; अभिनेत्रीचं देशमुख कुटुंबाशी असलेलं नातं माहितीये? title=
(Photo Credit : Social Media)

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani's Relationship with Dhiraj Deshmukh: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी हे काल 21 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. काल त्या दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन लग्न केलं. त्यांच्या या लग्न सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुखनं देखील हजेरी लावली होती. त्यानं संपूर्ण कुटुंबासोबत रकुल आणि जॅकीच्या लग्नात हजेरी लावली होती. इतकंच नाही तर त्यांच्या लग्नानंतर धीरनं संपूर्ण कुटुंबासोबत रकुल आणि जॅकीच्या लग्नाची मिठाई देखील वाटली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्याचं काय कारण आहे? चला तर जाणून घेऊया काय आहे त्या मागचं कारण...

धीरज देशमुखची पत्नी दीपशिखा ही जॅकी भगनानीची सख्खी बहीण आहे. त्यामुळे रकुल आणि जॅकीच्या लग्नात त्यांनी सह-कुटुंब हजेरी लावली होती. तर भावाच्या लग्नाच्या आनंदानंतर पतीसोबत मिळून दीपशिखानं तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींना मिठाई वाटली. या व्हिडीओ आपण पाहू शकतो की धीरजनं क्रिम रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर दीपशिखानं पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. तर त्यांच्या लेकीनं गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रकुल प्रीत आणि जॅकी या दोघांनी ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर ते दोघं एकत्र विविध पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. रकुल आणि जॅकी यांच्यातील जवळीक ही लॉकडाऊन दरम्यान वाढली. त्याचं कारण म्हणजे ते दोघं शेजारी होते. अशात लॉकडाऊनमध्ये कुठे ही जाण्याचा पर्याय नसल्यानं त्यांच्यात बोलणं सुरु झालं आणि त्यानंतर हळू हळू मैत्री... मग मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 

हेही वाचा : 'बिग बॉस 16' च्या शिव ठाकरे , अब्दु रोजिकला ईडीचे समन्स, रेस्टॉरंट आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी फसले?

रकुल आणि जॅकीनं त्यांच्या नात्याविषयी बोलताना सांगितलं होतं की "आमच्यात झालेली मैत्री आणि त्यानंतर आमचं नातं अत्यंत सहजपणे सुरु झालं होतं. आम्ही मित्र म्हणून एकमेकांसोबत वेळ घालवत होतो आणि तीन-चार महिन्यांतच आम्हाला एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती. आम्ही एकमेकांचे शेजारी आहोत हे आम्हाला सुरुवातीला माहितही नव्हतं. दरम्यान, इतक्या वर्षांत आमच्यात कधी मैत्रीसुद्धा झाली नव्हती. पण लॉकडाऊनमध्ये सगळं असं जुळून आलं."