Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीननं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान मिळवलं. आज त्याच्या अभिनयाचे चाहते फक्त सर्वसामन्य लोक नाही तर सेलिब्रिटी देखील आहेत. त्याच्या सॅक्रेड गेम या सीरिजचे तर आजही लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीनं मटेरिअलिस्टी गोष्टींचं  त्यांच्या आयुष्यात महत्त्व आहे का? यावर वक्तव्य केलं आहे. दरम्यान, मुलाखतीतच नवाजुद्दीननं त्याच्याच घरातील एक बल्बही फोडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाजुद्दीन सिद्दीकीनं अनफिल्टर्ड विद समदीश या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नवाजुद्दीनला प्रश्न विचारण्यात आला की मटेरिअलिस्टी गोष्टींचं आयुष्यात महत्त्व आहे की नाही? त्यावेळी समदीश हा नवाजुद्दीनला त्याच्या घराविषयी विचारत होता. त्यावर उत्तर देत नवाजुद्दीन म्हणाला, या काय गोष्टी आहेत. हे काय आहे. हे मी उद्या विकेन. त्यावर समदीश नवाजुद्दीन म्हणाला की एक ट्यूबलाईट तोडूया. नवाजुद्दीन म्हणाला हा बोल, कोणता तोडायचा. मी खरंच बोलतोय आणि हसू लागतो. समदीश यावर म्हणाला, मी मस्करी करत होतो. काय तू पण. काय माणूस आहेस तू आणि ते दोगे हसू लागतात. त्यानंतर समदीश बोलतो एक फोडूया चला. त्यावर नवाजुद्दीन बोलतोय खरंच बोलतोय मीपण चल ना फोडूया. त्यानंतर नवाजुद्दीन हा त्यांच्या समोर असलेल्या पूल टेबलवर असलेल्या त्याची काठी उचलली आणि त्यानं घरातील एक बल्ब तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बल्ड फूटला नाही तर त्याचं जे स्टॅड होतं ते आणि काठी तुटली. दुसरीकडे समदीश हा सोफ्यावर बसून हसत होता. 


त्यानंतर नवाजुद्दीन हा तिथे असलेल्या एका व्यक्तीला विचारतो की कसला बल्ब आहे हा? लोखंडाचा आहे का? कारण काठी तुटली पण बल्ब काही तुटला नाही. त्यानंतर नवाजुद्दीन आणि समदीश दोघे पुन्हा हसू लागतात. 


हेही वाचा : हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा गल्ला


दरम्यान, याशिवाय त्यानं काम मिळालं नाही तर पुढे काय करणार याविषयी देखील वक्तव्य केलं आहे. यावेळी नवाजुद्दीन म्हणाला की काम मिळालं नाही तर काय करणार. तर तो म्हणाला की 'कोणाकडे काम मागयला जाणार नाही. मी घर विकेन, बूट विकेन रस्त्यावर अभिनय करेन.'