हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा गल्ला

Hrithik Roshan Fighter 100 cr Box Office Collection : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्च्या 'फायटर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींची कमाई. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 29, 2024, 11:54 AM IST
हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा गल्ला title=
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan Fighter 100 cr Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फायटर' हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदनं केलं. तर सर्वत्र या चित्रपटाची स्तुती सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटानं पहिल्या दिवशी काही जास्त कमाई केली नसली तरी आता मात्र चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचं कलेक्शन केलं आहे. 

'फाइटर' नं पहिल्या दिवशी 22.5 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ होऊ लागली. दुसऱ्या दिवशी चित्रपटानं 40 कोटींच्या आसपास झाली. तर शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे म्हटले जाते. sacnilk नं दिलेल्या बातमीनुसार, चित्रपटानं शनिवारी 27.5 कोटींची कमाई केली. तर रविवारी 28.50 कोटींचं कलेक्श केलं. त्यासोबतच देशात आतापर्यंत 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 4 दिवसात फायटरनं 118.00 कोटींची कमाई केली. तर वर्ल्डवाईड कलेक्शन विषयी बोलायचे झाले तर 'फाइटर' नं जवळपास 180 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटानं फक्त तीन दिवसात 150 कोटीं पेक्षा जास्त कमाई केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोवर, अक्षय ओबेरॉय आणि ऋषभ साहनीसारखे कलाकार दिसले. चित्रपटात हृतिक आणि दीपिकाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. आतपर्यंत करण्यात आलेल्या सिनेमेटोग्राफीपेक्षा या चित्रपटाची सिनेमेटोग्राफी पूर्णपणे वेगळी होती. चित्रपटातील एरियल अॅक्शन सीननं प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाला भारतात जवळपास 4300 स्क्रिन्स मिळाले. सध्याचा ट्रेंड पाहता पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला चेन्नईत जवळपास थिएटर्समध्ये 60 ते 80 टक्के होते. 

हेही वाचा : ट्रॉफी जिंकली पण इज्जत गमावली! Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी म्हणाला...

हा चित्रपट 2D, '3D, IMAX 3D, 4DX 3D, ICE 3D आणि IMAX 2D मध्ये प्रदर्शित झाला आहे. असं म्हटलं जातं की हा चित्रपट जवळपास 250 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटात VFX चा वापर खूप चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे. त्यातील अॅक्शन सीन्सनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाला संमिश्र रिव्ह्यू मिळत आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदची हृतिक रोशनसोबत असलेला हा तिसरा चित्रपट आहे.