मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' या चित्रपटाचा टीझर लॉन्चिंग सोहळा आज पार पडला. या चित्रपटात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे.


नवाजुद्दीन साकारणार बाळासाहेबांची व्यक्तीरेखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नवाजुद्दीन दुसऱ्या एका चित्रपटाच्या शुटींगसाठी मॉरिशिअसमध्ये आहे... त्यामुळे तो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकला नसला तरी त्यानं आवर्जुन व्हिडिओच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली.


काय म्हटलं नवाजुद्दीननं...


जगातील कोणत्याही कलाकाराला बाळासाहेबांची भूमिका करायला आवडेल... कारण त्यांचं व्यक्तीमत्वचं अशा पद्धतीचं होतं... माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी संजय राऊत, दिग्दर्शक अभिजित पानसे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देऊ इच्छितो... मी त्यांचा आभारी राहीन... आम्ही या आत्मचरित्राला एका वेगळया उंचीवर नेऊ शकू अशी खात्री आहे... हा टिझर लॉन्च करणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांचे धन्यवाद...


बाळासाहेबांची प्रेरणा...


'सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की हा मराठी कसा कसा बोलेल... मी त्यांना खात्रीने सांगतो बाळासाहेब ठाकरे मला प्रेरणा देतील, आशिर्वाद देतील... आणि त्यांची लाडकी भाषा मराठी माझ्यावरही तेवढंच प्रेम करेल... जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र' असं मराठीत बोलत नवाझुद्दीननं आपल्या टीकाकारांनाही उत्तर दिलंय.



शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या 'ठाकरे' या सिनेमाचं चित्रिकरण फेब्रुवारी-मार्च २०१८ पासून सुरू होणार आहे. ८० दिवसांत या चित्रपटाचं शुटिंग पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येतंय.