मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप उमटवली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपट, वेबसीरीजमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नवाजुद्दीनने कधी-कधी इंग्रजी भाषा समजत नाही पण तरीही इंग्रजी चित्रपट पाहायला आवडत असल्याचं म्हटलंय. 'चित्रपटातील पात्राला काय म्हणायचं आहे हेच मला अनेकदा समजत नाही. परंतु मला वाटतं की इंग्रजी भाषा माहित असलेल्यांपेक्षा मी या चित्रपटांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असल्याचं' नवाजुद्दीनने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आयएमडीबी'च्या 'द इनसाइडर वॉच' या शो दरम्यान नवाजुद्दीनने आपल्या आवडत्या चित्रपटांबाबत सांगितलं. 'वोंग कार वाई यांच्या 'इन द मून फॉर लव' या चित्रपटातील टोनी लेऊंगची भूमिका मला अतिशय आवडली. त्यांनी चित्रपटातील आपली भूमिका अतिशय सुंदर साकारली होती. हे भाव आपण त्यांच्या डोळ्यांत किंवा चेहऱ्यावर पाहू शकत नाही परंतु ते आपल्या बुद्धीचा वापर करत साकारत असलेली भूमिका आपल्यापर्यंत पोहचवतात. 'बाइसिकल थीव्स' या चित्रपटात आपल्याला असं वाटतच नाही की अभिनेता अभिनय करतोय. असं काम मला अतिशय आवडतं' असं नवाजुद्दीनने म्हटलंय.



चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघायला आवडतं. महानायक अमिताभ बच्चन यांचे अॅक्शन चित्रपट पाहायला आवडत असल्याचं नवाजुद्दीनने सांगितलं. 


'मला भाई सलमान खानचे चित्रपट पाहायलाही मजा येते. स्वॅगवाले चित्रपट मला आवडतात. मी मनोरंजनासाठी हे चित्रपट पाहतो. स्वॅगसाठीच आणि जे हवं आहे ते पाहायलं मिळतं असल्याने या चित्रपटात कोणतीही कमी वाटत नाही.' असंही नवाजुद्दीनने म्हटलंय. 



आपल्या अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीनने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नवाजुद्दीनने 'ठाकरे' चित्रपटात साकारलेली भूमिका, 'सेक्रेड गेम्स' वेबसीरीजमधला नवाजुद्दीनच्या अभिनयालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. नुकत्याच 'फोटोग्राफ' या चित्रपटातून त्याने पुन्हा एक वेगळी भूमिका साकारली आहे.