मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तो एक अशा कलाकारांमध्ये येतो जो कोणती पण भूमिका साकारुन पडद्यावर गाजण्यात माहिर आहे. नवाजुद्दिनची एक्टिंगची जादू मोठ्या पडद्यापासून ते डिजीटल प्लॅटफॉर्मपर्यंत चालली आहे. यामध्ये आता त्याने आपल्या करिअरला घेवून एक मोठा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओटीटीला अलविदा करत आहे नवाजुद्दीन
खरंतर जिथे काही मोठे-मोठे स्टार ओटीवर पदार्पण करत आहेत. तिथे नवादुद्दीनने ओटीटीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयाने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र दुसरीकडे प्रत्येकजण नवाजुद्दीनच्या या निर्णयाचं कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.


ओटीटी कंटेंटसाठी नाराज आहे अभिनेता
मिडीया रिपोर्ट्सनुसार, मागील काही दिवसांपासून नवाजुद्दीन ओटीटी प्लॅटफॉर्मच्या कंटेंटवर नाराजी जाहीर करत आहे. अशामध्ये आता एक्टरने ओटीटीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय की, तो आता ओटीटीवर काम नाही करणार. नवाजुद्दीनचं म्हणणं आहे की, ओटीटी मोठं प्रोडक्शन हाऊससाठी एक धंदा बनला आहे.


ओटीटीचा रंग उडला आहे
पुढे नवाजुद्दीन म्हणाला, आता आमच्याकडे असे शो राहिले आहेत. जे पाहण्याच्या लायक नाही आहेत. किंवा ते सिक्वल्स आहेत. ज्यांच्याकडे काही बोलण्यासारखं नाहीये. मी ज्यावेळी नेटफ्लिक्सचा सेक्रेट गेम्समध्ये काम केलं होतं. तेव्हा ओटीटीवर काम करण्याचा एक अत्साह होता. मात्र आता या प्लॅटफॉर्मचा सगळा रंगच उडून गेला आहे.