Nawazuddin Siddiqui: रूपेरी पडद्यावर पुरूष कलाकारही (Transgender) स्त्री पात्र सहज करताना दिसतात त्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा रंगते. अनेकदा त्यांना यासाठी ट्रोलही केले जाते. परंतु त्यांचे चाहतेही त्यांचे कौतुक करताना दिसतात. सध्या अशाच एका कलाकाराची चर्चा आहे आणि ती म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याची. 'हंडी' (Handi Movie) या त्याच्या आगामी चित्रपटात त्यानं ट्रान्सजेंडरची भुमिका निभावली आहे. त्यामुळे त्याच्या या लुकची सर्वत्र चर्चा आहे. त्याला या लुकसाठी किती वेळ लागला याबद्दलची सध्या चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणतीही भुमिका करण्यासाठी फार मोठा प्रमाणात मेहनत घेतली जाते आणि त्यातूनही सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे मेकअप! आपला लुक सेट करण्यासाठी यावर जास्त वेळ खर्ची होता. 'हंडी' या आगामी सिनेमात नवाजुद्दीकी सिद्दीकी हा ट्रान्सजेंडरची भुमिका करतो आहे तेव्हा यासाठी त्याला जबर मेहनत घ्यावी लागली आहे. पुरूषानं स्त्री होणं सोप्पं नाही. लिंग बदलल्यानंतर एका वेगळ्या आयुष्याला सुरूवात होते. रूपेरी पडद्यावर ही भुमिका निभावणं तेवढंच आव्हानात्मक. नवाजुद्दीन सिद्दीकी याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सलग तीन तास बसून मेकअप केल्यानंतर नवाजुद्दीकीचा लुक पुर्ण होतो आहे. ज्यानंतर तो खूपच सुंदर दिसतो आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. काहींनी म्हटलंय की, ''वाह किती सुंदर लुक'' तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय, ''हूशार अभिनेता''. तर अशीच एक कमेंट करत एका युझरनं लिहिलंय की, ''हार्ड वर्क''. तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे. त्याच्या या लुकवर काहींना कमेंट केलीये की, ''या लुकसाठी नावजुद्दीनला घेण्यापेक्षा सरळ स्त्री कलाकारच घ्यायला हवी होती.'' तर अनेकांनी नवाजुद्दीनचे कौतुक केलेच आहे सोबतच त्याच्या मेकअप आर्टिस्टचेही केले आहे. 


हेही वाचा - शिल्पा शेट्टीनं केली महागडी सर्जरी, त्यापुर्वी 'अशी' दिसायची अभिनेत्री; पाहून बसेल धक्का


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. नवाजुद्दीन गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीमुळं चर्चेत आला आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या वार्ता सर्वत्र पसरू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचीच चर्चा रंगली आहे. परंतु अभिनयासाठी नवाजुद्दीन विशेष ओळखला जातो. त्याच्या अभिनयाचे अनेक प्रेक्षक दिवाने आहेत. साधा, सरळ आणि खरा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीच उतरतो. त्याच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.