Nawazuddin Siddiqui Struggle Story: अनेक कलाकार हे वेगवेगळ्या प्रातांतून आणि परिस्थितीतून आलेले असतात. त्याचसोबतच त्यांनी अभिनयात येणाऱ्यापुर्वी एका वेगळ्या क्षेत्रातही काम केलेले असते. आम्ही तुम्हाला आज अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्यानं अभिनयक्षेत्रात येण्यापुर्वी चक्क वॉचमनची नोकरी पत्करली होती. आपली रोजी रोटी करण्यासाठी हा अभिनेता एकेकाळी वॉचमन होता परंतु आज हाच अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खानलाही टक्कर देतो आहे. तुमच्या डोळ्यासमोर कदाचित अनेक नाव आली असतील परंतु आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा अभिनेता कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत खान मंडळी राज्य करून आहेत. परंतु 2010 नंतर अनेक वेगवेगळ्या तऱ्हेचा अभिनय करणारे कलाकार हे मनोरंजनसृष्टीत आले आणि त्यांनी अक्षरक्ष: खान मंडळींना चांगलीच मोठी टक्कर दिली आणि त्यातलच एक नाव म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. आज हा अभिनेता एक सुपरस्टार आहे. जेव्हा नव्या अर्थानं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नाना तऱ्हेचे विषय हाताळायला सुरूवात झाली होती. तेव्हा अनेक नवनवे प्रयोगही होऊ लागले होते. त्यात असे नव्या दमाचे कलाकार हे येऊ लागले होते. त्यातलच एक नावं होतं ते म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याचे. 


2012 पासून खऱ्या अर्थानं नवाजुद्दीनला ओळख मिळाली. त्याच्या याच साली आलेल्या 'तलाश' या चित्रपटातील भुमिकेमुळे त्याला फार मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली. एवढंच नाही तर त्यानंतर त्याच्या हरएक चित्रपटातल्या भुमिकेसाठी त्याचे कौतुक करण्यात आले होते. सोबतच त्याच्या 2018 साली आलेल्या 'सेक्रेड गेम्स' वेबसिरिजमुळे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाचे चांगलचे कौतुक केले गेले. या दरम्यान त्याला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आज नवाजुद्दीन हा ओटीटी स्टारही झाला आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. त्याचे सोशल मीडियावरही असंख्य फॉलोवर्स आहेत. तो आपल्या आगळ्यावेगळ्या भुमिकेसाठी आजही ओळखला जातो. 


हेही वाचा - 'गंदी बात'च्या पोस्टरमुळे वादाला फोडणी; कमळाच्या फुलात स्त्रियांचे 'तसले' फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप


असाही एक संघर्ष: 


गॅग्स ऑफ वासेपूर या चित्रपटांमुळे त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. अनेकांनी त्याला त्याच्या अभिनयासाठी क्रिटिसाईजही केले परंतु त्यानंतर एकाहून एक चित्रपट दिल्यानंतर त्याला प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त झाली होती. त्यानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आपले अभिनयाचे शिक्षण पुर्ण केले आहे. त्यानं 1999 सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यावेळी त्याला फारशी ओळख मिळाली नव्हती परंतु आता 'बदलापूर', 'ठाकरे', 'बजरंगी भाईजान', 'गुमेकतू', 'द लंज बॉक्स'सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्यानं हॉलिवूडमध्येही काम केले आहे.