मुंबई : कोणताही सण असो मुंबईत तो अगदी गुण्या गोविंदाने साजरा केला जातो. या सणांना कोणत्याही जाती धर्माचं बंधन नसतं. आणि हल्ली शाळेत हे सण आवर्जून साजरे केले जातात. ज्यामुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच एकोप्याची भावाना दृढ व्हावी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवाजुद्दीनने आपल्या २ वर्षाच्या मुलाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आणि या फोटोसोबत तो म्हणतो की, ‘मी माझ्या मुलाच्या शाळेमुळं आज खूपच खूष आहे. याचं कारण म्हणजे माझ्या मुलाला शाळेनं ‘नटखट नंदलाल’ बनण्याची संधी दिली आहे.’आपल्याला माहितच आहे एक सच्चा कलाकार म्हणून नवाजुद्दीनकडे पाहिलं जातं. आणि सच्चा कलाकाराला कधीच कोणत्याही जाती-धर्माचं बंधन नसतं. 



 नवाजुद्दीननं आपला दोन वर्षाचा मुलगा 'यानी सिद्दीकी'याचा भगवान कृष्णाची वेशभूषा केलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त नवाजुद्दीननं त्याच्या मुलाला कृष्णाची वेशभूषा केल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे.


नवाजुद्दीननं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा यानी कृष्णाच्या वेषभूषेत खूपचं गोड दिसत असून बासरी वाजवत आहे.सहा हजारांपेक्षा जास्त हा फोटो रिट्विट झाला असून २० हजार लोकांनी त्याला लाईक केलं आहे. नवाजुद्दीननं सर्व-धर्म-समभावचा संदेश दिल्याच्या प्रतिक्रिया यूजर्सकडून व्यक्त केल्या जात आहेत.