Nayanthara Bollywood Movie : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा ही शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात दिसली. या चित्रपटात नयनतारा आणि शाहरुखमध्ये रोमान्स दाखवण्यात आला आहे. ॲटलीचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. दरम्यान, आता अशी चर्चा सुरु आहे की ॲटलीनं जशी वागणूक दिली त्याला नयनतारा ही चिडली आहे. तर नयनतारा तिच्या बॉलिवूड डेब्यूनं काही आनंदी नसल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुत्सान टाईम्सला एका सोर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, नयनताराला आता कोणताही बॉलिवूड चित्रपट करण्याची इच्छा नाही. ॲटलीनं चित्रपटातील तिचा रोल कापला असून दीपिकाची भूमिका ही वेगळ्या पद्धतीनं दाखवण्यात आली.  तर दुसरीकडे नयनताराच्या भूमिकेला इतकं महत्त्व देण्यात आलं नाही, त्यामुळे नयनताराला त्याचा राग आला आहे. 


दीपिकानं या आधी देखील शाहरुखच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिला जवानच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत कास्ट करण्यात आले. पण तिची भूमिका ही प्रेक्षकांवर एक वेगळीच छाप सोडून गेली आहे. तर ज्या सोर्सनं त्यांना नयनताराच्या नाराजगिचे कारण सांगितलं त्यांनी सांगितलं की ही पाहुण्या कलाकारांची भूमिका नव्हती. जवान हा चित्रपट शाहरख आणि दीपिकाचा आहे असं दाखवण्यात आलं. नयनतारा ही दाक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री आहे आणि त्यामुळे जवानमध्ये तिला जशी वागणूक मिळाली ते तिला पटलं नाही. त्यामुळे लवकरच तिला कोणत्या बॉलिवूड चित्रपटामध्ये आपण पाहू शकणार नाही. 


हेही वाचा : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची पन्नाशीकडे वाटचाल, तरीही राहुल गांधीना डेट करण्याची इच्छा अपूर्णच


नयनतार अनेकदा जवानच्या प्रमोशनमध्ये दिसली नाही. इतकंच नाही तर मुंबईतील जवानच्या सक्सेस पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नयनतारा दिसली नव्हती. कार्यक्रमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा आणि ॲटली दिसला होता. तर नयनतारा नो प्रमोशन या कॉन्सेप्टमध्ये विश्वास ठेवते असे म्हटले जाते. तर तिला वाटतं की तिचं काम अभिनय करणं आहे प्रमोशन करणं नाही, असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. जवाननं 13 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 900 कोटींचा गल्ला केला.