Nayantara and Vigesh Surrogacy Case: अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन (Nayantara and vignesh shivam) यांनी काही दिवसांपुर्वीच सेरोगसीच्या आधारे दोन जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. त्यानंतर त्यांच्या सरोगसीवर अनेक प्रश्न उभे राहिले. यावर अनेकांनी आरोप - प्रत्यारोपही सुरू केले होते. किंबहूना सेरोगसीचे सगळे नियम मोडून नयनतारा आणि विघ्नेश यांनी मुलांना जन्म दिला असल्याचे सांगितले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा विरोध अचानक वाढत असतानाच तामिळनाडू सरकारनं तीन सदस्यांचे पॅनेल तयार केले आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. आता समोर आलेल्या अहवालात राज्य सरकारच्या पथकाकडून असा दावा केला गेला आहे की त्या दोघांनी सेरोगसीचे (Surrogacy) कोणतेच नियम मोडलेले नाहीत.


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


या पॅनेलच्या म्हणण्यानुसार या दोघांनी कुठलाच कायदा मोडलेला नाही. मात्र, सरोगसी करणाऱ्या रुग्णालयाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. नयनतारा-विघ्नेश भारताबाहेर असल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी तो आजतागायत बोलू शकला नसल्याची माहितीही टीमने दिली.


अहवाल असे सूचित करतात की सरोगेट आईने नोव्हेंबर 2021 मध्ये नयनतारा-विघ्नेशसोबत करार केला होता त्यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला.


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य


पॅनेलने आपल्या अहवालात त्या खासगी रुग्णालयावरही जोरदार टीका केली आहे. याप्रकरणी त्यांनी रुग्णालयाला नोटीसही पाठवली आहे. नयनतारा आणि विघ्नेश (Nayantara and Vignesh relationship) दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या वर्षी जूनमध्ये विवाहबद्ध झाले. रजनीकांत, शाहरुख खान, विजय सेतुपती, एआर रहमान, सुरिया यांसारख्या अनेक स्टार्सनी दोघांच्या लग्नाला हजेरी लावली होती.