Drugs Case : NCB कडून अभिनेत्याला अटक, फारूख बटाटाची 8 तास चौकशी
NCB ने एजाजची केली कसून चौकशी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता एजाज खानला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे. एनआयएचा असा संशय आहे की, एजाज खान, ड्रग लार्ड फारूख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटासोबत काम कर आहेत. तसेच एजाज खान ड्रग्स सिंडिकेटचा एक भाग आहे. एनसीबीने एजाजची काल खूप वेळ कसून चौकशी केली. यानंतर त्याला अटक करण्यात आली.
याअगोदर एनसीबीने ड्रग्स लॉर्ड फारूख बटाटाची जवळपास 8 तास चौकशी केली त्यानंतर त्याला जाऊ दिलं. फारूखचा मुलगा शादाबला गेल्या आठवड्यात एनसीबीने एका छापेमारी दरम्यान अटक केली. त्याच्याजवळ जवळपास 2 करोड रुपयांची ड्रग्सची खेप सापडली होती. शादाबच्या चौकशी दरम्यान सेलिब्रिटींची नावे समोर आली होती.
एजाज खान मंगळवारी राजस्थानवरून मुंबईत आला तेव्हा त्याला एनसीबीने नोटिस देत अटक केली. एनसीबीने एजाज खानच्या अंधेरी ते लोखंडवाला अशा ठिकाणांवर छापा मारला. मात्र या छापेमारीत काहीच हाती लागलं नाही. मात्र छापेमारीनंतर एजाजला अटक करण्यात आली.
या अगोदर एनसीबीने 25 मार्च रोजी मुंबईचा सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारूख बटाटा याच्या मुलाला शादाब बटाटाला अटक केली होती. एनसीबीने तीन ठिकाणी लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड येथे छापेमारी केली. या छापेमारीत एनसीबीने खूप मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. ज्याची बाजारात किंमत 2 करोड रुपये इतकी आहे.
असं सांगितलं जात आहे की, शादाब बटाटा ड्रग्सच्या धंद्यात खूप आधीपासून आहे. मुंबईतील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना तो ड्रग्स सप्लाय करण्याचं काम करतो. एनसीबी खूप दिवसांपासून याचा शोध घेत होती. माज्ञ 25 मार्च रोजी छापेमारीत एक मोठं यश मिळालं. एनसीबीने अनेक महागड्या गाड्या देखील ताब्यात घेतल्या आहेत.