एनडीएच्या `या` दोन नेत्यांनी चित्रपटातही एकत्र केलंय काम; बॉक्स ऑफिसवर ठरला होता फ्लॉप
Chirag Paswan and Kangana Ranaut Film: लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. पुन्हा एकदा मोदी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत.
Chirag Paswan and Kangana Ranaut Film: लोकसभा निवडणुका 2024चा निकाल समोर आला आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असं असलं तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाहीये. त्यामुळं भाजपला मित्रपक्षाची गरज भासणार आहे. या युती सरकारमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. इतकंच नव्हे तर कलाकारांनीही विजय मिळवला आहे. हेमा मालिनी आणि कंगना रणौट या सारख्या कलाकारांचाही समावेश आहे. तर, बिहारमध्ये एलजेपी पक्षातून चिराग पासवान यांनीही विजय मिळवला आहे. एलजीपी एनडीएचाच एक घटक पक्ष आहे. मात्र तुम्हाला माहितीये का एनडीएचे दोन नेते राजकारणच नाही तर चित्रपटातही एकत्र काम केले आहे.
कंगना रणौट आणि चिराग पासवन या दोन नेत्यांना एका चित्रपटात काम केले आहे. राजकारणात पाऊल ठेवण्यापूर्वी चिराग पासवन बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावले होते. मात्र, बॉलिवूडमध्ये त्यांना फार काही यश मिळालं नाही. त्यांनी कंगना रणौटसोबत चित्रपटात काम केले होते. मिलें न मिले हम या चित्रपटात कंगना रणौट आणि चिराग पासवान यांनी एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2011 मध्ये आला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू फार काही चालली नाही. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. मिलें न मिलें हम हा चिराग पासवान यांचा डेब्यू चित्रपट होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटल्याने त्यांनी पुन्हा कधीच चित्रपटात काम केले नाही.
आता चिराग पासवान हे पूर्णपणे राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी कमी वेळातच राजकारणातील डाव-पेच आखले आणि शिकून घेतली. चिराग पासवान हे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. तसंच, रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग यांच्याकडे लोक जनशक्ती पक्षा (राम विलास)ची धुरा आली आणि त्यांनीही मोठ्या ताकदीने पक्ष सांभाळला. लोकसभेत चिराग पासवान यांच्या पक्षाने एकूण पाच जागांवर उमेदवार उभे केले होते. त्या पाचही जागांवर ते निवडून आले आहेत. हाजीपुर येथून चिराग पासवान यांनी विजय मिळवला आहे.
तर, कंगना रणौट यांनी हिमाचल प्रदेशमधून मंडी येथून भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. कंगनाला मोठा विजय मिळाला आहे. चिराग पासवान आणि कंगना रणौट हे आता एनडीए सरकारमध्ये पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत.