`चेकअपला सांगून गेले आणि... ` लक्ष्मीकांत बेर्डे यांची `ती` आठवण सांगून नीलम शिर्के भावूक
`वादळवाट`, `असंभव` सारख्या मालिका तसेच `पछाडलेला` सारख्या सिनेमांमधून घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे नीलम शिर्के. नीलम शिर्के सध्या अभिनय क्षेत्रापासून पूर्णपणेच दूर आहे. आमदार उदय सामंत यांची पत्नी असलेल्या नीलम शिर्के यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा `तो` किस्सा.
पछाडलेल्या सिनेमामधून लक्ष्यामामांसोबत छान ट्युनिंग झालं. ते सीनियर जरी असले तरी आम्हाला चाचपडून बघायचे की, आम्ही चांगले आर्टिस्ट आहेत की नाही. त्यानंतर आम्ही नाटकातही एकत्र काम केलं. 'मी बबन प्रामाणिक' असं या नाटकाचं नाव होतं. या नाटकात लक्ष्मीकांत, प्रसाद ओक आणि सगळी टीम होती. यावेळी लक्ष्मीकांत त्या टीमला मार्गदर्शन करायचे. कुठे उभं राहावं, कसा आवाजफेक असावा याबाबत ते सांगायचं, असं नीलम शिर्के सांगत होती.
एक दिवस रिहर्सलला लक्ष्यामामा आले आणि मी थोडा आराम करतो, असं म्हणाले. पुढे, मला बरं वाटत नाही तासभर रिहर्सल करुन ते कुमार सोहोनींना सांगून आराम करायला गेले. दुसऱ्या दिवशीही आले आणि कुमार सोहोनींना खालूनच फोन लावला. मी जरा चेकअप करून येतो. मला कालपासून बरं वाटत नाही. पण लक्ष्या मामा त्यानंतर चेकअप करायला गेले पण त्यानंतर ते आम्हाला कधीच भेटले नाही. लक्ष्या मामांसोबतचा तो शेवटचा क्षण होता, याची कल्पना आम्हाला नसल्याच नीलम शिर्के सांगते.
नीलम शिर्के अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीपासून दूर आहे. नीलम शिर्केचं लग्न आमदार उदय सामंत यांच्यासोबत झालं आहे. नीलम शिर्के किंवा उदय सामंत त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. नीलम शिर्के यांनी स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरु केलं असून त्या मार्फत काम सुरु असल्याचं सांगते.