माझी चूक आहे; लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत: ला का जबाबदार ठरवतात नीना गुप्ता?
Neena Gupta and Daughter Masaba Gupta : नीना गुप्ता या त्यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या घटस्फोटासाठी स्वत: ला जबाबदार ठरवतात. याविषयी मसाबानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
Neena Gupta and Daughter Masaba Gupta : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता ही एक फॅशन डिझायनर आहे. मसाबा आपल्या सगळ्यांना नेटफ्लिक्सवरील 'मसाबा मसाबा' या सीरिजमध्ये देखील दिसली होती. आई नीना गुप्ता प्रमाणेच मसाबा देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमची चर्चेत राहते. मसाबानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की तिची आई म्हणजेच नीना गुप्ता या तिच्या घटस्फोटासाठी स्वत: ला जबाबराद ठरवतात.
मसाबानं ही मुलाखत अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाच्या ट्विकइंडिया या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मसाबानं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी मसाबा तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि निर्माता मधु मंतेना यांच्याविषयी देखील बोलताना दिसली. त्यावेळी बोलताना मसाबा म्हणाली की 'माझ्या आईची इच्छा होती की मी लवकरात लवकर लग्न करायला हवं. त्यात जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता. माझ्या आईला या गोष्टीवर विश्वास होत नव्हता की आम्ही खरंच विभक्त होत आहोत. ती म्हणायची की आताच तर सुरुवात झाली आणि इतक्यात संपतय. दोन वर्षच तर झाले होते, तुम्ही दोघांनी जास्त वेळ देखील घेतला नाही.'
मसाबा पुढे म्हणाली की 'मला लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायचे होते. पण माझी आई या विरोधात होती. जेव्हा तिला आमच्या नात्याविषयी कळलं तेव्हा तिनं लगेच सगळा सामान बांधलं आणि घरातून निघून जाण्यास सांगितलं. तर दुसऱ्याच दिवशी तिनं माझं कोर्टात लग्न लावून दिलं. तिचं म्हणणं होतं की लग्नाशिवाय कोणी कधीही सोडून जाऊ शकतं. तिचं म्हणणं होतं की मी तिच चूक करायला नको जी तिनं केली होती. हेच कारण होतं की तिला लवकरात लवकर माझं लग्न करायचं होतं.'
मसाबानं हे देखील सांगितलं की 'जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा ती खूप दु:खी झाली होती. तिनं मला सांगितलं की ही संपूर्ण माझी चूक आहे. हे माझ्यामुळे होतं आहे. मी तुला लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहु द्यायला हवं होतं. मी खूप वाईट आई आहे.'
मसाबाच्या आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं दुसरं लग्न केलं आहे. तिचा पती हा अभिनेता सत्यदीप मिश्रा आहे. ते दोघे आनंदी आयुष्य जगत आहेत. त्या दोघांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात लग्न केले.