Neena Gupta Girish Karnad: आज बॉलिवूडमध्ये चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींची आणि त्यांनी निभावलेल्या भुमिकांची त्यांच्या अभिनयाची जोरात चर्चा असते किंबहुना त्यांनी केलेल्या त्या त्या भुमिकांमुळे ते अधिक लक्षात राहतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा आहे आणि ती म्हणजे नीना गुप्ता. नीना गुप्ता यांच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा असते. आधीपासून तिच्या अभिनयाची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून सध्या तिच्या अभिनयाची जोरात चर्चा ही रंगलेली असते. त्यातून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखली जाते. तिची मुलगी मसाबा गुप्ता ही देखील लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे. मसाबा मसाबा ही तिची वेबसिरिजही प्रचंड गाजली होती. सोबतच या सिरिजचा दुसरा पार्टही आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नीना गुप्ताची प्रचंड चर्चा आहे. यावेळी ज्येष्ठ दिवंगत अभिनेते गिरीश कर्नाड यांनी नीना गुप्ता हिच्याबद्दल केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 1982 साली आलेल्या 'साथ साथ' या चित्रपटानंतर नीना यांना मुर्ख मुलीच्याच भुमिका ऑफर होऊ लागल्या होत्या. त्यावर आता तिनं भाष्य केले आहे. या चित्रपटातून ती नीना हिनं चश्मा लावलेल्या एका सर्वसाधारण आणि किंचित वेडसर, भोळ्या मुलीची भुमिका केली आहे. शारजा इंटरनॅशनल बुक फेअरदरम्यान नीना गुप्ता म्हणाल्या, मला साथ साथ या चित्रपटात एका विनोदी आणि खोड्या मुर्थ अशा मुलीची भुमिका देण्यात आली होती जी प्रत्येक गोष्टीला नाही म्हणते. हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला आणि त्यातून माझी भुमिकाही तेव्हा प्रचंड गाजली होती. लोकांनाही ती आवडली होती. 


हेही वाचा : कॉलेज ग्रुपच्या फोटोत दिसणारी 'ही' सोज्वळ मुलगी आज आहे प्रचंड हॉट, बोल्ड अन् ग्लॅमरस अभिनेत्री


यावेळी नीनानं गिरीश कर्नाड यांचा एक किस्सा सांगितला आहे. ती म्हणाली, "त्यावेळी हा चित्रपट पाहून गिरीश कर्नाड म्हणाले की, मला यापुढे प्रमुख भुमिका किंवा हिरॉईन म्हणून भूमिका मिळणं बंद होईल कारण जेव्हा तुम्ही एखादी विनोदी भूमिका साकारता तेव्हा तिथेच तुमच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागतो असं गिरीश कर्नाड यांचं मत होतं.


त्यांचं म्हणणं अगदी योग्यच होतं. पुढील काही वर्षं तरी मला तशाच विनोदी भूमिका ऑफर केल्या गेल्या. हा एक व्यवसाय आहे आणि त्यावेळी मला मार्गदर्शन करणारेसुद्धा फारसे कुणीच नव्हते. मी एनएसडीमधून शिक्षण घेऊन आले असल्याने मला मुंबईत लगेच काम मिळेल असा माझा समज होता पण तो चुकीचा ठरला. हा चित्रपट व्यवसाय आहे आणि मला याबद्दल फारशी माहिती नसल्याने मी तेव्हा बऱ्याच चुका केल्या.'' अशी आठवण सांगत त्या प्राजंळपणे म्हणाल्या. 


गिरीश कर्नाड हे लोकप्रिय हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील अभिनेते होते. त्यांनी अनेक प्रादेशिक चित्रपटांतूनही कामं केली आहेत. त्यांचा स्मिता पाटील यांच्यासोबतचा 'उंबरठा' हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. 2019 साली त्यांचे निधन झाले.