मी मोठी असले म्हणून काय झालं? सलमानसोबत रोमान्स करण्यावर नीना गुप्तांचं वक्तव्य
नीना यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना गुप्ता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांशी संपर्कात राहतात. नीना या लवकरच 'ऊंचाई' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात नीना यांच्या व्यतिरिक्त अभिनेता अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सूरज बडजात्याचा यांच्या या चित्रपटात 4 मित्रांची कहाणी दाखवली आहे. ज्या वयात स्वप्न पूर्ण होणं अशक्य असतं त्या वयात हे मित्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करताना दिसतात. या निमित्तानं नीना यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी नीना पटकन सलमान खानसोबत (Salman Khan) रोमॅंटिक चित्रपट करण्याबाबत बोलल्या आहेत.
सलमानसोबत चित्रपट करण्याबाबत नीना यांना प्रश्न विचारता त्या म्हणाल्या, 'गेल्या वेळी मी अनिल शर्मा यांचा चित्रपट केला होता. त्या चित्रपटात सलमानच्या आईची छोटीशी भूमिका होती. पण मला त्याच्यासोबत काही मोठं करायचं आहे. एक व्यक्ती म्हणून मला तो खूप आवडतो. तो नेहमीच सगळ्यांची मदत करतो, कोणत्याच गोष्टीचा मोठेपणा करत नाही. मला यामुळे माहित आहे कारण काही वर्षांपूर्वी मसाबानं सांताक्रूझमध्ये एक ऑफिस भाड्यानं घेतलं होतं. त्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला लोकांची गर्दी होती. कोणी डॉक्टर यायचे असं मला वाटतं. तिथे जे पण लोक येतात त्यांची फ्रीमध्ये ट्रीटमेंट करण्यात येते. अशा चांगल्या गोष्टी आपल्याला माहित नाही. त्याच्याविषयी जास्त माहित नसतानाही एक व्यक्ती म्हणून मला तो खूप आवडतो, (Neena Gupta says want to do a romatic film with Salman Khan)
सलमानसोबत कसं काम करायचं आहे या विषयी बोलताना नीना पुढे म्हणाल्या, 'मला सलमानसोबत एक रोमँटिक चित्रपट करायचा आहे, आईची भूमिका नाही. सध्या ही मैत्री (ऊंचाई) केली आहे, ती मैत्री त्याच्या आणि माझ्यात असू शकत नाही. जेव्हा 60 वर्षांचा पुरुष 20 वर्षाच्या मुलीशी लग्न करू शकतो, तेव्हा आमच्यात फारसा फरक नाही.
त्या पुढे म्हणाल्या, 'वयस्कर पुरुष आणि तरूणी असं आहेच, आपला समाज असा आहे. याउलट, असा चित्रपट कोणी बनवणारही नाही, कदाचित तो चित्रपट काही काम करणार नाही. पण जर तुम्ही सूरज जी सारखी स्क्रिप्ट लिहिली तर तुमच्याकडे अप्रतिम कल्पना असू शकतात. मी खूप लाजाळू आहे आणि सलमानसोबतच्या भूमिकेसाठी कोणाला विचारू शकत नाही, असेही तिने म्हटले आहे.
नीना म्हणाल्या, 'सूरजने हा चित्रपट मैत्रीवर बनवला आहे, असे होऊ शकते की तो माझ्या आणि सलमानसोबत एक कम्पॅनियनलशिप चित्रपट करेल. सलमान पेक्षा मी मोठी आहे तर त्यात काय अडचण आहे. कदाचित तो माझ्याकडून रिलेशनशिपविषयी काही शिकेल किंवा मी त्याच्याकडून शिकू शकेन, पण हे फक्त सूरज जी लिहितील यावर अवलंबून आहे. त्यानंतर नीना जोरात हसू लागतात. दरम्यान, सलमान हा 56 वर्षांचा आहे, तर नीना गुप्ता 63 वर्षांच्या आहेत. नीना गुप्ता सलमान खानपेक्षा 7 वर्षांनी मोठ्या आहेत.