मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नीना या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय नीना या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. नुकताच, नीना यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीना यांचा हा व्हिडीओ ‘द कपिल शर्मा शो’मधील आहे. नेहमी ज्या प्रकारे कपिल येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या खासगी आयुष्यातील किंवा कोणाला माहित नसलेल्या गोष्टी विचारतो. त्या प्रमाणे त्यानं नीना यांनांही असाच एक प्रश्न विचारला की 'तुम्हाला ‘बेवॉच’ चित्रपटात पामेला एंडरसनची भूमिका साकारायची होती.' यावर नीना या कपिलला उत्तर देत म्हणाल्या, 'अरे माझे बूब्स इतके मोठे नाही मग कसं करणार.' नीना यांनी दिलेलं उत्तर ऐकूण तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात. 



दरम्यान, नीना या सगळ्यात शेवटी 'गूडबाय' या चित्रपटात दिसल्या. या आधी त्या सरदार का '83', ‘ग्रॅंड सन’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘मसाबा मसाबा’ आणि 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये ही काम केले आहे.