नीरज चोप्राला आवडते बॉलिवूडमधील `ही` व्यक्ती
शनिवारी टोकियो ऑलिम्पिक जिंकून भारताचे डोकं अभिमानाने उंचावणारा नीरज चोप्रा सतत चर्चेत आहे.
मुंबई : शनिवारी टोकियो ऑलिम्पिक जिंकून भारताचे डोकं अभिमानाने उंचावणारा नीरज चोप्रा सतत चर्चेत आहे. त्याने जॅवलिन थ्रोमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. आज देशातील प्रत्येक व्यक्ती फक्त नीरजबद्दल बोलत आहे. त्याच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी लोक हतबल झाले आहेत. या विजयानंतर नीरजचं सर्वस्तरावरुन भरभरुन अभिनंदन होत आहे.
नीरजच्या बायोपिकवर चर्चा सुरू
हरियाणाच्या पानिपत भागातील एका छोट्या गावात राहणारा नीरज आज देशवासीयांचा लाडका बनला आहे. सोशल मीडियावरही फक्त नीरजचीच चर्चा आहे. दरम्यान, आता नीरजच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सचं नाव जोरदार व्हायरल होत आहे. याचबरोबर, असंही म्हटलं जात आहे की, जर नीरजचा बायोपिक बनला असेल तर त्यात त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये कोण दिसू शकेल.
बॉलिवूडमध्ये खेळाडूंचे बायोपिक्स आवडतात
बॉलीवूडमध्ये बायोपिक्सचा बराच काळ ट्रेंड आहे. विशेषत: खेळाडूंच्या जीवनावर बनवलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला फार आवडतात. अशा परिस्थितीत आता नीरजच्या सक्सेसनंतर त्याच्या बायोपिकबद्दल बरीच चर्चा होत आहे. त्याचबरोबर नीरजचे काही जुने व्हिडिओ या दरम्यान व्हायरल होऊ लागले आहेत.
नीरजला हे स्टार्स आवडतात
2018च्या मुलाखतीत नीरजला विचारण्यात आलं होतं की, 'तुझ्यावर बायोपिक बनवला गेला तर तुमचं पात्र साकारणारा अभिनेता कोण असेल?' यावंर नीरजने असं उत्तर दिलं की, "जर असं घडलं, तर ती खूपच चांगली गोष्ट आहे. जरी मला हरियाणाचा रणदीप हुड्डा खूप आवडत असला, तरी त्याच्याशिवाय अक्षय कुमारही या पात्रासाठी चांगला दिसेल."
चाहते बायोपिकची वाट पाहत आहेत
आता एकीकडे संपूर्ण देश नीरजच्या विजयाबद्दल अभिनंदन करत आहे, तर दुसरीकडे लोक त्याच्या बायोपिकचीही आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांचा विश्वास आहे की, लवकरच नीरजवर एक बायोपिक बनू शकतो, ज्यामध्ये अक्षय किंवा रणदीप मुख्य भूमिकेत दिसू शकतात.