मुंबई : बॉलीवूडमध्ये अनेक सुंदर अभिनेत्री असल्या तरी, सुंदरता आणि साधेपणाचा विचार केला तर नीतू कपूरचं नाव अग्रस्थानी येतं. अलीकडेच आलिया आणि रणबीरच्या लग्नात आलियाशिवाय चाहत्यांच्या नजरा नीतू कपूरवर खिळल्या होत्या. तिच्या जबरदस्त डिझायनर पोशाखांव्यतिरिक्त, नीतू कपूरने तिच्या सौंदर्याने सर्वांचं मन जिंकलं. पुन्हा एकदा नीतू कपूरचा मनाला आनंद देणारा सुंदर लूक सोशल मीडियावर समोर आला आहे. लाल रंगाच्या सुंदर पोशाखात नीतू कपूर खूपच सुंदर दिसत आहेत.
 
एलिगंस आणि ब्यूटीचं जबरदस्त कॉम्बिनेशन 
गेल्या काही आठवड्यांत डान्स दिवाने ज्युनियर्स प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. अतिशय सुंदर अभिनेत्री नीतू कपूर, नोरा फतेही आणि कोरिओग्राफर मर्झी पेस्टोनजी या शोला जज करत आहेत. डान्स दिवानेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये नीतू कपूर यांची सुंदर स्टाइल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. अलीकडेच नीतू कपूर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर त्यांचे अतिशय सुंदर फोटो अपलोड केले आहेत.



या फोटोंमध्ये नीतू कपूर स्टायलिश रेड कलरची साडी परिधान करताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिचा लूक अतिशय अभिजात आणि ग्रेसने कॅरी केला आहे. पहिल्या फोटोत, जिथे नीतू कपूरने लाल रंगाच्या सोनेरी भरतकामाच्या लांब जॅकेट सोबतच तिच्या ड्रेसला एक अतिशय स्टाइलिश लूक दिला आहे. तर दुसऱ्या फोटोत, नीतू कपूर बेल्टसह साडी नेसलेली अप्रतिम दिसतायेत. नीतू कपूर यांचं सौंदर्य आणि साधेपणा चाहत्यांची मने जिंकत आहे. हा लूक पुर्ण करण्यासाठी नितू कपूर यांनी कर्ल्स हेअर स्टाईल ठेवली आहे.  याचबरोबर सुंदर ऍक्सेसरीजने  नितू यांचा लूक चाहत्यांना आवडला असून या फोटोवर चाहते लाईक्स कमेंटचा वर्षाव करत आहेत.