मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेव्हा त्यांनी प्रेमाची कबुली दिली, त्यानंतर आलिया आणि रणबीर लग्न कधी करणार?  असा प्रश्न वारंवार विचारण्यात आला. पण अद्यापही आलिया, रणबीर आणि दोघांच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. पण आता रणबीर आणि आलिया लवकरचं लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तयारी सुरू असताना, रणबीरची आई अभिनेत्री नितू कपूर यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या दोघांचं लग्न तर केव्हाचं झालं आहे... त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रत्येक जण संभ्रमात पडला आहे. 



सध्या नितू कपूर यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फोटोग्राफर्स त्यांना आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल विचारतात, यावर नितू म्हणतात, 'मला नाही माहिती कधी आहे लग्न.. 


पुढे नितू यांना विचारतात की, '14 तारखेला लग्न  असल्याचं समोर येत आहे, तुम्ही काय म्हणाल, त्यावर नितू म्हणतात, 'असं म्हणत असतील तर मी सांगते त्यांचं लग्न झालं आहे...' 


नितू यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी  या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे. 


बॉम्बे टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रणबीर कपूरने त्याच्या वास्तू बिल्डिंगमध्ये 8 दिवसांसाठी बँक्वेट हॉल बुक केला आहे.आलिया आणि रणबीरने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.