मुंबई : बाहुबली अभिनेता प्रभासच्या 'साहो' चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. बुधवारी यूएईमध्ये चित्रपटाचे स्क्रिनींग ठेवण्यात आले होते. जमलेल्या काही चित्रपट समिक्षकांनी 'साहो'चे तोंड भरून कौतुक केले. ऍक्शन-थ्रिलर चित्रपटाला समिक्षकांनी ४ स्टार देखील दिले. सकारात्मक प्रतिक्रियां नंतर काही समिक्षकांनी चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रीया दिल्या आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका हिंदी फिल्म डिस्ट्रीब्यूटरने चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रभासची हिंदी डबिंग, अभिनेत्री श्रद्धा कपूरची कामगिरी, चित्रपटाच्या कथेला रटाळ सांगत 'साहो'वर टीका करण्यात येत आहे.  


 


> Average 1st half



तब्बल ३५० कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेल्या 'साहो' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीथ यांनी केले आहे. परदेशातून चित्रपटावर नकारात्मक प्रतिसाद उमटल्यानंतर आता हा चित्रपट भारतात चाहत्यांचे किती मनोरंजन करेल हे पाहाणे महत्वाचं ठरणार आहे. 


'साहो' हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास आणि श्रद्धाव्यतिरिक्त चित्रपटात जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे. नील नितिन मुकेश अशी तगडी स्टारकास्टही भूमिका साकारणार आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी 'साहो' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.