मुंबई : दहीहंड्यांच्या निमित्तानं रस्त्यावर झिंगलेल्या, मुलींना छेडणाऱ्या हुल्लडबाजांमुळे कदाचित तुम्हीही व्यथित झाला असाल... अशीच व्यथा अभिनेता चिन्मय मांडलेकर याची पत्नी नेहा हिनं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी ठिकठिकाणी दहीहंड्या आणि एकावर एक थर रचणारे गोविंदा दिसत होते... या दरम्यान दोन गोविंदांना आपल्या प्राणालाही मुकावं लागलं. रस्त्यारस्त्यांवर दिसणारे कोणत्याही सुरक्षेशिवाय उंचच उंच रचले गेलेले थर, गाण्यांचा आवाज आणि हुल्लडबाजी यामुळे व्यथित होणाऱ्यांपैकी नेहाही एक आहे.


एक आई म्हणून, एक महिला म्हणून आपल्याला दरवर्षीच हा सगळा प्रकार पाहून धक्का बसतो, असं नेहानं या व्हिडिओत म्हटलंय. सोबतच तिनं काही विचार करायला भाग पाडणारे प्रश्नही विचारलेत... 


नेहाचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत ७६ हजारांहून अधिक जणांनी पाहिलाय. दोन हजारांहून अधिक लाईक्स आणि ९०० पेक्षा जास्त शेअर या व्हिडिओला मिळालेत.


काय म्हणणं आहे नेहाचं... ऐकुयात तिच्याच तोंडून