मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या चर्चा अजून संपल्याही नाहीत तोवर आणखीन एका बॉलिवूड अभिनेत्रीनं तिच्या चाहत्यांना जोरदार धक्का दिलाय. अभिनेत्री नेहा धुपिया हिनं अचानक आज आपल्या लग्नाचा फोटो शेअर केलाय. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मात्र मोठा पण सुखद धक्का बसलाय. 2002 साली 'मिस इंडिया' ठरलेल्या नेहानं तिचा मित्र आणि बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी याच्यासोबत विवाह केलाय. अंगद बेदी हा भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचा मुलगा आहे. अंगद आणि नेहाच्या लग्नानंतर बिशनसिंग बेदी यांनी या दोघांचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंबरोबरच बेदी यांनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीमधल्या एका गुरुद्वारामध्ये नेहा आणि अंगदचं लग्न झालं. या विवाहसोहळ्याला ठराविक नातेवाईक आणि मित्रच उपस्थित होते. या लग्नाला माजी क्रिकेटपटू अजय जडेजा, आशिष नेहरा आणि कॉमेंटेटर गौरव कपूर आले होते.




नेहाच्या लेहंग्याची चर्चा


नेहाच्या पेहरावाची सर्वात जास्त चर्चा सोशल मीडियावर आहे. पिंक कलरच्या रंगामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. चंदेरी फॅब्रिकवर बनलेल्या लेहंग्यावर फ्लोरल मोतिफ्सची खास एम्ब्रॉयडरी केली गेली आहे. बनलाय. डिझायनर अनिता डोंगरेच्या कलेक्शनमधील हा लेहंगा आहे. समर वेडिंग्स लक्षात ठेवून या लेहंग्याचे पूर्ण काम करण्यात आले आहे. यासोबतच गोटा पट्टी वर्क, जरदोजी, रेशम, डोरी आणि सीक्वन वर्क करुन लेहंगा स्पेशल बनला आहे. साधारण २ लाख इतकी या लेहंग्याची किंमत असल्याचे म्हटले जात आहे. नेहा आणि अंगदचा विवाह गुरुद्वारामध्ये संपन्न झालाय. त्यानंतर नेहा आणि अंगदनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या विवाहाचा फोटो शेअर केलाय. आयुष्याचा सर्वोत्तम निर्णय... मी आज माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह केलाय... अशी कॅप्शनही नेहानं या फोटोला दिलीय.