मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही दिवसांपासून आपल्या अभिनयामुळे लाइमलाइटमध्ये राहिली आहे. एवढंच काय तर आता अशी चर्चा आहे की, नेहाने हल्लीच बूब जॉब देखील करून घेतली आहे. आपल्या फिगरला आणखी आकर्षक करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री ही सर्जरी करून घेतात. अशातच नेहा धुपियाने देखील ब्रेस्ट सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरावर नेहा धुपियाने पहिल्यांदाच बोलणं पसंत केलं आहे. नेहाने म्हटलं आहे की, मी फक्त सुंदर दिसण्यासाठी माझ्या शरिराला त्रास देऊ शकत नाही. मी कोणतीच सर्जरी केलेली नाही आणि मला याची गरज देखील नाही. मी अशा कित्येक महिलांना ओळखते त्यांना मी ब्रेस्ट सर्जरी करता देखील सुंदर असल्याच पाहिलं आहे. 


नेहाने पुढे सांगितलं की, मी अशा पद्धतीच्या गोष्टी नाही करणार. मी हल्लीच विद्या बालन यांच्या 'तुम्हारी सुलु' या सिनेमात काम केलं आहे. तसेच आता काजोलसोबत 'हेलिकॉप्टर एला' सिनेमात काम करत आहे. या दोन्ही अभिनेत्री स्वतःला सुंदर दिसण्यासाठी कोणतीही सर्जरी केलीली नाही तरी या दोन्ही सुंदर अभिनेत्री आहेत असं देखील नेहाने सांगितलं. नेहाने पुढे हसत सांगितलं की, एकतर जॉबवर फोकस करू शकतो किंवा बूब जॉबवर. सोनम कपूरचं लग्न झाल्यावर लगेचच अंगद बेदीसोबत नेहाने लग्न केलं. नेहा धुपियाने कधी बॉलिवूडमध्ये जास्त कमाल करू शकली नाही.