Neha Dhupia Troll : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) ही कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे तर कधी प्रोफेश्नल लाइफमुळे चर्चेत असते. नेहा ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. जर कोणी तिला काही बोलत असेल तर ती त्याला सडेतोड उत्तर लगेचच देते. दरम्यान, नेहा आता तिच्या रॅम्पवॉकमुळे चर्चेत आली आहे. नेहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे नेहा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर कमेंट करत ट्रोलिंगच्या सगळ्या हद्द पार केल्या आहेत. (Neha Dhupia Troll Over Her Walk)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहाचा हा व्हिडीओ फिल्मीग्यान या इन्स्टाग्रामच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत नेहानं शिमरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये नेहा स्टायलिश दिसत असून ती रॅम्पवॉक करत आहे. असं असताना अनेकांनी नेहाला तिच्या दिसण्यावरून ट्रोल केले आहे. एक नेटकरी तिच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, 'वेस्ट इंडिजची हीरोईन दिसत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ही मला कधीच आवडली नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तू म्हातारी कोंबडी झाली आहेस.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ही आता चांगली दिसत नाही.' नेहाच्या वजनावरून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. 


पाहा व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नेहा धूपियाच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर तिनं करिअरच्या सुरुवातील अनेक छोटी मोठी काम केली होती. नेहानं म्युजिक व्हिडीओपासून जाहिरातींपर्यंत सगळ्यात काम केलं होतं. 2002 साली नेहानं मिस इंडियाचा खिताब तिच्या नावी केला. पण तुम्हाला माहितीये का इंडियन फॉरेन सर्विसमध्ये नेहाला तिचं करिअर करायचं होतं. पण ग्लॅमरच्या जगात नेहानं एकदा प्रवेश केला आणि त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. मिस इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर नेहानं 2003 साली प्रदर्शित झालेल्या 'कयामत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय कपूर, अरबाज खान आणि रवीना टंडन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 


हेही वाचा : माझ्या हृदयावर राज्य करणारी नवी राणी आली; Atif Aslam ची 'ती' पोस्ट व्हायरल


दरम्यान, नेहानं 2018 साली अभिनेता अंगद बेदीशी लग्न केलं. त्याच वर्षी नेहानं तिच्या मुलीला जन्म दिला होता. तिच्या मुलीचं नाव महर धूपिया बेदी असं आहे. त्यानंतर 2021 मध्ये नेहानं तिच्या मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव गुरीक सिंह धूपिया बेदी असं आहे.