मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्करचा(Neha Kakkar)  आवाज आज करोडो लोकांना आवडत आहे. नेहाने मेहनत आणि जिद्दीने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. नेहा कक्कर आता रिऍलिटी शो इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. एक वेळ अशी होती की नेहा याच शोमध्ये स्पर्धक म्हणून आली होती. पण आता ती बॉलिवूडची प्रसिद्ध गायक आहे. नेहा एक उत्तम गायक आहेचं, पण सोशल मीडियावर देखील तिचा बोलबाला असतो. आता देखील नेहाने सोशल मीडिया एक व्हिडिओ पोस्ट केला. 



नेहाने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोहनप्रीत नेहावर हात उचलताना दिसत आहे. शिवाय नेहाने देखील रागात दिसत आहे. रोहनप्रीत आणि नेहाची केमिस्ट्री सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये 'खढ़ तैनू मैं दस्सा' असं लिहिलं आहे. 


सांगायचं झालं तर नेहा आणि रोहन लवकरचं त्याचं नवीन गाणं 'खढ़ तैनू मैं दस्सा' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रमोशल स्टंट असल्याचं सागंण्यात येत आहे. त्यामुळे रोहन आणि नेहा कधी त्यांचं नवीन गाणं प्रदर्शित करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.