मुंबई : आपल्या आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी गायिका नेहा कक्कड आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाने रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'मधून एक स्पर्धक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. नेहाला तिच्या एका यूट्यूब व्हिडिओेने प्रसिद्धीझोतात आणलं आणि त्यानंतर ती करियरच्या वेगळ्याच उंचीवर पोहचली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहाने बॉलिवूडच्या काही हिट गाण्याचं मॅशअप करुन २०१५ मध्ये यूट्यूबवर पोस्ट केलं होतं. ज्याला आतापर्यंत ४२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. २०१५ मध्ये पोस्ट केलेल्या या सेल्फी व्हिडिओमध्ये नेहाने स्वत:च्या आवाजात काही हिट रोमॅन्टिक गाणी गायली आहेत. 



नेहाचा जन्म एका पंजाबी कुटुंबात ६ जून १९८८ रोजी झाला. नेहा आणि तिच्या बहिणीने जगरातामध्ये भजन करत गायन क्षेत्रांत पदार्पण केलं. त्यानंतर नेहाची बहिण सोनू कक्कड बॉलिवूडमध्ये आली. त्यानंतर नेहा 'इंडियन आयडॉल'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली. ती इंडियन आयडॉल जिंकली नाही. परंतु त्यानंतर नेहाने स्वत: स्पर्धक असलेल्या 'इंडियन आयडॉल' शोमध्ये परिक्षक म्हणून एन्ट्री केली.



गेल्या काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या ब्रेकअपमुळे ती नैराश्यात असल्याचं तिने सांगितलं होतं. नेहा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांसोबत ती नवनवीन व्हिडिओही शेअर करत असते. नेहा तिच्या भावासोबत टोनी ककक्डसोबत गाण्यांचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. 



नेहाची बहिण सोनू कक्कडशिवाय तिच्या भावानेही टोनी कक्कडने बॉलिवूडमधून गायन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. टोनीची अनेक गाणी रिक्रिएट करुन चित्रपटांमध्ये दाखवली जात आहेत. टोनीने गायलेलं 'कोका कोला तू' हे गाणं अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या 'लुका छिपी' चित्रपटात पुन्हा रिक्रिएट केलं गेलं आहे.