मुंबई : नेहा कक्कर (Neha Kakkar) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. तिच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. रविवारी रक्षाबंधन हा सण उत्साहात पार पडला. यावेळी नेहा कक्करने रक्षाबंधनमध्ये किती ओवाळणी मिळाली? याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करते. एवढंच नव्हे नेहाने आपल्या ओवाळणीत मिळालेल्या रक्कमेपेक्षा भावाला टोनी कक्कर (Tony Kakkar) ला अधिक रक्कम दिली आहे. 


नेहा कक्करला मिळाले एवढे रुपये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा कक्कर (Neha Kakkar) ने हल्लीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नेहाने आपल्याला रक्षाबंधनमध्ये किती ओवाळणी दिली याचा खुलासा केला आहे. तिने फोटो शेअर करताना म्हटलंय की, टोनी कक्कडने यावेळी नेहाला चक्क एक रुपये ओवाळणी दिली आहे. नेहाने पण उशिर न करता टोनीला चक्क 2 रुपये दिले. याचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावर नेहा पोस्टमध्ये म्हणते की, मी तुझ्यावर दुप्पट प्रेम करते. दोन रुपयांची फॅन्सी राखी खरेदी करा. 



नेहाचे सुंदर फोटो हल्लीच नेहाने सफेद रंगाचे फोटो शेअर केले आहेत. या आऊटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. या फोटोत नेहा परीपेक्षा कमी दिसत नाही. मोकळे कुरळे केस, लांब कानातले, नाकात छान नोझरिंग आणि चेहऱ्यावरचा आनंद... नेहा कक्करच्या या फोटोने सोशल मीडियवर धुमाकूळ घातला आहे.



अलीकडच्या काळात नेहा कक्कड माध्यमांपासून अंतर ठेवत आहे. तिने इंडियन आयडॉल शो मधूनच सोडला. त्यानंतर तिची बहीण सोनू कक्करने जज म्हणून शो पुढे नेला.