मुंबई : अभिनेता नेहा कक्कर या ना त्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा नेहा कक्करच्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. नेहा आपल्या मित्राशी रोहनप्रीत सिंहसोबत लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र अद्याप या नात्याबाबत कोणतीही ऑफिशिअल माहिती समोर आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नेहा आणि रोहनप्रीत या महिन्याच्या अखेरापर्यंत लग्न करणार आहेत. हे लग्न दिल्लीत होणार असून पेन्डेमिकच्या कारणामुळे यामध्ये खूप लोकांची उपस्थिती असणार आहे. मात्र रोहनप्रीतच्या मॅनेजरने हे सूत्र नाकारलं आहे. दोघांनी एकत्र व्हिडिओ केल्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. रोहनप्रीतचा सध्या तरी लग्न करण्याचा काही प्लान नाही. 


काही दिवसांपूर्वी रोहनप्रीत आणि नेहाने एक म्युझिक व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये नेहा, रोहनप्रीतशी लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याबाबत बोलत आहेत. दोघांच्या लग्नाची ही हिंट असल्याचं म्हटलं जात आहे. रोहनप्रीतने या व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये नेहा त्याच्याकडे डायमंड रिंगची मागणी करत आहे. या व्हिडिओत रोहनप्रीत तिला अंगठी घालताना दिसत आहे. 


रोहनप्रीत रिऍलिटी शो 'मुझसे शादी करोगे'चा भाग राहिलेला आहे. त्या या कार्यक्रमात स्पर्धक होता ज्याला शहनाज गिलला लग्नासाठी इंप्रेस करायचं होतं. नेहाचं आदित्य नारायणसोबत लग्न होणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. अगदी इंडियन आयडलच्या सेटवर लग्नाचे ढोल देखील वाजवले गेले होते.