बोल्ड आणि किसिंग सिनबद्दल नेहा पेंडसे म्हणते...
`बोल्ड आणि किसिंग सिन करायला मला कही हरकत नाही, पण...`
मुंबई : 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिकेच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनिता भाभी ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडने जेव्हा मालिकेला रामराम ठोकला तेव्हा अभिनेत्री नेहा पेंडसेची सौम्याच्या जागी वर्णी लागली. अशात नेहाने बोल्ड आणि किसिंग बद्दल तिचं मत मांडलं आहे. काही गोष्टी सोडल्यातर मला बोल्ड आणि किसिंग सिन करण्यास काही हरकत नाही. असं नेहा म्हणाली आहे.
नेहा म्हणाली, 'ज्या सिनेमांची कथा लव्हस्टोरी भोवती फिरत असेल. मला किसिंग आणि बोल्ड सिन करायला काही हरकत नाही. एक वेळ अशी होती जेव्हा मला वाटतं होतं की बोल्ड आणि किसिंग सिनमुळे नाही तर मी माझ्या अभिनय कौशल्याने वर्चस्व प्रस्थापित करेल. '
ती पुढे म्हणाली, चांगल्या सिनेमांमधून मला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे असे सीन निर्माते योग्य पद्धतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये किसिंग सीन आणि बोल्ड सीन देण्याची गरज आहे तर मी ते नक्की देईन असे देखील नेहा म्हणाली. सांगायचं झालं तर नेहा कायम तिच्या भुमिकेमुळे चर्चेत असते. त्याआधी देखील ती वेग-वेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तर सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील करण्यात आलं.