Malaika Arora | `आज तरी लाज...`, नेटीझन्स मलायकावर संतापले
संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मलायकाने असंवेदनशीलपणा दाखवला.
मुंबई : देशाने आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना साश्रू नयनांनी निरोप दिला. दीदींवर मुंबईत शिवाजी पार्कात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीदींच्या जाण्याने एका काळाचा अंत झाला. दीदींनी 6 दशकं देशाला आपल्या गाण्यांनी मंत्रमुग्ध केलं. अनेकांनी सोशल मीडियावर दीदीच्या जाण्याने त्यांना आदरांजली व्यक्त केली. (netizens are trolled to actress malaika arora for her share hot photo afterr lata mangeshkar death)
संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) हद्दच केली. मलायकाने इंस्टाग्रामवर एक हॉट फोटो शेअर केला. या फोटोत मलायका स्वीमिंग पूलमध्ये रिलॅक्स पडली आहे. मलायकाने केसरी रंगाचा स्पोर्ट्स ब्रा आणि काळ्या रंगाचं शॉर्ट्स घातलंय. 'संडे सनी साईड अप' असं या फोटोला कॅप्शन दिलं आहे.
किमान आजच्या तरी दिवशी मलायकाने असं काही करणं नेटीझन्सना रुचलेलं नाही. नेटीझन्सनी या मुद्द्यावरुन मलायकाला कमेंट्सद्वारे चांगलंच झापलंय. किमान आज तरी लाज बाळगायला हवी होती, अशा आणि अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्यात.
दरम्यान लता दीदींच्या जाण्याने 2 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच राज्यात उद्या (7 फेब्रुवारी) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.