`निर्माता आणि दिग्दर्शक...`, `आई कुठे काय करते`चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Aai Kuthe Kay Karte : `आई कुठे काय करते` या मालिकेचा नवा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत आपल्याला नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी या मालिकेत दाखवण्यात आलं होतं की आशुतोषचं निधन होणार आहे. आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र, त्या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल करत आहेत.
हा व्हिडीओ सीरिजल जत्रा या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून प्रचंड व्हायरल होतोय. खरंतर गेल्या काही दिवसांपासून आशुतोषच्या मनात मनूसाठी वाढलेली धडधड आणि चिंता आपल्याला पाहायला मिळते. तर आता पुढे मनूचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांच्या मनात सुरु असता दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत सुरुवातील मनू ही आशुतोषला केक भरवताना दिसते. त्यानंतर माया आशुतोषला सांगते की ती मनूला कायमची घेऊन जाणार आहे. दरम्यान, यानंतर जेव्हा रात्रीच्या वेळी अरुंधती आणि आशुतोष हे घरी जात असतात. तेव्हा आशुतोषला समोर मनू असल्याचा भास होतो. त्यानंतर तो लगेच अरुंधतीला गाडी थांबवण्यास सांगतो. अरुंधती गाडी थांबवत नाही हे पाहता आशुतोष त्याचा सीटबेल्ट काढतोय हे पाहून अरुंधती त्याला सीटबेल्ट लाव असं सांगत असते. पण तो ऐकतच नाही. तर दुसरीकडे गाडी थांबवण्यासाठी जेव्हा अरुंधती ब्रेक लावते तेव्हा अचानक आशुतोष हा गाडीतून बाहेर पडलो. त्यानंतर आशुतोषचा जागीच मृत्यू होतो.
हेही वाचा : युट्यूबर एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांची अॅक्शन
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की "हास्यजत्रा पार्ट 2". दुसरा नेटकरी म्हणाला की, "सीट बेल्ट लावला नाही म्हणून लगेच गाडीता दरवाजा उघडला." तिसरा नेटकरी म्हणाला, "ही मनू आणि माया आल्यापासून ही मालिका जरा जास्तच बोरिंग झाली." आणखी एक नेटकरी म्हणाला की "निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या गुडघ्यात मेंदू आहे, एखादी नॉर्मल व्यक्ती इतकी मूर्ख नक्कीच असू शकत नाही की वेग असणाऱ्या चालत्या गाडीचा दरवाजा उघडेल." दुसरा नेटकरी म्हणाला, "हे फार चुकीचं आहे. एवढ्या पटकन श्वानही मरणार नाही... मग माणसाचे कसे निधन होईल लगेच. निदान ट्रक येतोय अस ती दाखवायचं आणि तिच्यावर आरोप का?"