मुंबई : भारताच्या चांद्रयान २ मोहिमेविषयी नेमक्या काय घडामोडी घडत आहेत, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर इतरही सर्वच स्तरांमध्ये या मोहिमेअंतर्गत संपर्क तुटलेल्य़ा विक्रम लँडरशी पुन्हा एकदा संपर्क होण्याकडेच साऱ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या. उत्सुकता आणि कुतूहलाच्या याच वातावरणात आला एका हॉलिवूड अभिनेत्याचाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या अभिनेत्याने थेट नासामध्ये जातच इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेविषयी आपला प्रश्न विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या मोहिमेविषयी कुतूहलापोटी प्रश्न विचारणाऱ्या या अभिनेत्याची नेटकऱ्यांनी प्रशंसाच केली आहे. विक्रम लँडरचं काय झालं? असं विचारणारा तो अभिनेता म्हणजे, ब्रॅड पीट.  सूत्रांच्या माहितीनुसार नासाच्या Nick Hague या अंतराळवीराला ब्रॅडने विक्रम लँडरविषयीचा प्रश्न विचारला. 


विज्ञान आणि काल्पनिक कथेवर आधारित Ad Astra या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ब्रॅडला नासामध्ये बोलवण्यात आलं होतं. तेव्हाच त्याने अंतराळवीराला तुम्ही चंद्रावर पोहोचण्याची भारताची मोहिम पाहिली का, असा प्रश्न विचारला. त्याच्या या प्रश्नावर अंतराळवीराने नकारार्थी उत्तर देत आपणही  बातम्यांमधून मिळणाऱ्या माहितीचा आधार घेत असल्याचं स्पष्ट केलं. 


ब्रॅडचा हा अंदाज पाहता सोशल मीडियावर अनेकांनीच त्याची प्रशंसा केली. एक भारतीय म्हणून आपल्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, असं म्हणतही नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. 



७ सप्टेंबरला चंद्रापासून अवघ्या काही अंतरावर असतानाच विक्रम लँडरशी होत असणारा संपर्क तुटला आणि अगदी शेवटच्या टप्प्यात असणारी भारताची चांद्रयान २ मोहिम एका वेगळ्या वळणावर आली. ज्यानंतर इस्रोकडून विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्यात त्यांच्या वाट्याला अपेक्षित यश मात्र आलं नव्हतं.