मुंबई : 70 आणि 80च्या दशकात लाखो दिलो की धडकन असणारी अभिनेत्री नाव रेखा आहे, रेखा यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र रेखाचा सिने प्रवास अजिबात सोपा नव्हता.  रेखा यांचं संपूर्ण आयुष्य संघर्षमय आहे. लहानपणापासून त्यांना वडिलांचं प्रेम मिळालं नाही. सिनेमात काम करण्याची इच्छा नसतानाही त्यांना चित्रपटांमध्ये काम करावं लागलं. घर बसवण्याचा प्रयत्न केला परंतु ते मिळू शकलं नाही आणि ज्याच्यावर प्रेम केलं ते ही मिळू शकलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेखा यांच्या कारकिर्दीबद्दल बोललं गेलं तर, 1969मध्ये रेखा आणि विश्वजित 'अंजना सफर' या सिनेमांत काम करत होते. या चित्रपटात एक किसिंग सीन शूट करण्यात येणार होता. जेव्हा रेखा यांना या सीनबद्दल विचारण्यात आलं.  तेव्हा ती घाबरू लागली आणि तिने हा सीन करण्यास नकार दिला, मात्र चित्रपटाच्या टीमने खात्री दिल्यानंतर रेखाने हा सीन मोठ्या कष्टाने शूट केला.



जेव्हा रेखा आणि विश्वजितदादा यांचा हा सीन शूट करण्यात आला तेव्हा रेखा इतक्या घाबरल्या होत्या की, तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. वारंवार वारंवार हा सीन शूट होत असल्याने रीटेक्समुळे रेखा बेहोश झाली. एका किसिंग सीनमुळे नायिका चक्कर आली हे हिंदी सिनेमात प्रथमच घडत होतं. ही गोष्ट माध्यमात वाऱ्यासारखी पसरली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच मोठा वाद निर्माण झाला.


जेव्हा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला गेला, तेव्हा त्यांनी 'अंजना सफर' चित्रपटातील हा किसिंग सीन काढून टाकण्यास सांगितला. या प्रकरणामुळे हा चित्रपट लटकला. मग हा चित्रपट १-२ वर्षांनंतर प्रदर्शित झाला नाही तर तब्बल दहा वर्षानंतर1979मध्ये 'दो शिकारी' या नावाने प्रदर्शित झाला.